Panaji Corporation
Panaji Corporation Dainik Gomantak
गोवा

Panaji Corporation Budget : मनपाचे ११६.४५ कोटी खर्चाचे बजेट; २.१९ कोटींची शिल्लक अपेक्षित

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Corporation Budget :

पणजी महानगरपालिकेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी महसूल प्राप्ती ११८.६४ कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, या वर्षासाठी ११६.४५ कोटींचा खर्च दर्शविण्यात आला आहे. त्यातून २.१९ कोटींची शिल्लक राहणार आहे. सोमवारी सायंकाळी महापौर रोहित मोन्सेरात यांनी पुढील वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले.

महापालिकेच्या सभागृहात झालेल्या सभेस आयुक्त क्लेन मेदेरा, उपमहापौर संजीव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. लेखा आणि कर अधिकारी सिद्धेश नाईक यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले आणि त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

महानगरपालिकेस महसूल प्राप्ती पावतीद्वारे २०२४-२५ मध्ये ९३.५४ कोटी होईल, २०२३-२४ मध्ये व २०२२-२३ मध्ये पावतीद्वारे महसूल अनुक्रमे ६०.४५ कोटी व ५३.३ कोटी असा अंदाजित महसूल होता. भांडवली पावत्यांद्वारे महसूल २०२४-२५ साठी २५.१० कोटी येईल, असे त्यांनी सांगितले.

उच्च न्यायालयातील दाव्यांमुळे घरांवरील कररुपाने मिळणाऱ्या महसुलात साडेतीन कोटींची घट झाली आहे. तरीही फेरी व इतर उपक्रमांतून महसूल प्राप्ती होते. ‘स्मार्ट सिटी’च्या बसस्थानकावर उभारलेले जाहिरात फलक हटवले आहेत. त्यातून मनपाला महसूल मिळणार नव्हता, असेही मोन्सेरात म्हणाले.

बैठकीला नगरसेवकांची दांडी

अंदाजपत्रक सादर करण्याविषयी बोलाविलेल्या आजच्या बैठकीस विरोधी नगरसेवक नेल्सन काब्राल, सुरेंद्र फुर्तादो, रुथ फुर्तादो, ज्योएल आंद्रादे, तर सत्ताधारी गटाचे प्रसाद आमोणकर, करण पारेख, प्रमेय माईणकर, आदिती चोपडेकर, वसंत आगशीकर, शुभम चोडणकर यांची अनुपस्थिती होती.

मार्केटमधील भाडेकरार होणार तरी कधी?

दरम्यान, यावेळी मार्केटमधील भाडेकरारावरून नगरसेवक उदय मडकईकर यांनी बाजार समितीचे चेअरमन बेंटो लॉरेन यांना विचारणा केली. त्यावर लॉरेन यांनी चेंडू महापौरांच्या गोटात ढकलला. महापौर त्याविषयी सांगतील असे त्यांनी नमूद केले. त्यावर महापौर मोन्सेरात यांनी भाडेकरार यावर्षी होईल, असे आश्‍वासन मडकईकर यांना दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT