Bhoma Villagers Protest Against Expansion of Highway file photo  Dainik Gomantak
गोवा

Bhoma Villagers Protest: महामार्गाचे रूंदीकरण नाही म्हणजे नाहीच! ग्रामस्थ आक्रमक, थेट सरपंचाना घेराव

'बायपास'साठी लढा तीव्र करण्याचा निर्धार

Akshay Nirmale

Bhoma Villagers Protest Against Expansion of Highway: पणजी-बेळगाव महामार्गावरील नियोजित महामार्ग रूंदीकरणाला भोमा येथे रहिवाशांचा विरोध आहे. येथील काही घरे या रूंदीकरणात जाणार असल्याने येथे रूंदीकरण करण्यास ग्रामस्थ विरोध करत आहेत.

रस्ता रूंदीकरणाऐवजी बायपास करा, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. त्याच पार्श्वभुमीवर आज, बुधवारी भोमा ग्रामस्थांनी सरपंचांना घेराव घातला.

ग्रामस्थांनी सरपंचांना घेराव घालत बायपाससाठीचा लढा आणखी तीव्र करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. भोमा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाबाबत चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत विस्तारीकरणास विरोध दर्शविला.

ग्रामस्थ म्हणाले की, आम्हाला थ्रीडी प्रेंझेटेशन नको, आम्ही रस्ता रूंदीकरण करू देणार नाही, आमची मागणी आहे बायपास करा, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

रविवारीच भोमावासीयांनी महामार्गाच्या रूंदीकरणाला विरोध करत, बायपासच्या मागणीसाठी रॅली काढली होती. 'आमका जाय, आमका जाय, बायपास आमका जाय,' अशा घोषणा देत मोठ्या संख्येने ग्रामस्थ या रॅलीत सहभागी झाले होते.

या वेळी क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे हे देखील उपस्थित होते. त्यांनी स्थानिकांच्या बाजूने राहण्याची ग्वाही दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT