Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : केजरीवालांसाठी ‘आप’च्या नेत्यांचे उपोषण; आझाद मैदानावर ठिय्या

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी,आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना कथित अबकारी घोटाळ्यात ईडीने अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपच्या नेत्यांना अटक करण्याचे काम भाजप करीत आले आहे. आम आदमी पक्ष कोणालाही घाबरत नाही, आम्ही कोणालाही भीत नाही, असे ॲड. अमित पालेकर यांनी सांगितले.

केजरीवाल यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ रविवारी आम आदमी पक्षाच्यावतीने आझाद मैदानावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. दरम्यान, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही उपस्थिती लावून या आंदोलनास आपला पाठिंबा दर्शविला. या उपोषणामध्ये पक्षाचे राज्याचे निमंत्रक अमित पालेकर, आमदार व्हेंझी व्हिएगस, आमदार क्रुझ सिल्वा, सुरेल तिळवे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

या आंदोलनाविषयी ॲड. पालेकर म्हणाले, की कथित अबकारी घोटाळ्यात कोणतेही पुरावे नसताना दिल्लीचे मुख्यमंत्री तथा पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या नेत्यांना अटक केली आहे, कोणत्याही पुराव्याविना केलेली अटक ही सरासर लोकशाहीची हत्या आहे.

आम्ही केजरीवाल यांच्याबरोबर असल्याचे दाखविण्यासाठी हे उपोषण आहे. भाजप हा विरोधकांना त्रास देण्याचे काम करीत आहे. कुडचडेत आपच्या आमदारांना प्रचारापासून रोखले, लोकांचा आवाज आम्ही उठवत राहू. धर्म, देश, संविधान आणि भविष्याच्या रक्षणासाठी आम्ही काम करीत आहोत.

सांतिनेजमधील वडाचे झाड रात्रीचे कापण्यात आले, ही भाजपची दबावशाही आहे. हिंदू संस्कृतीनुसार ज्या वडाची पूजा भाजपच्या महिलांनी केली, त्या महिला कुठे गेल्या? असा सवाल करीत ॲड. पालेकर यांनी झाड कापण्याचा सरकार, मुख्यमंत्री अथवा भाजप महिलांनी निषेध केला नसल्याचे नमूद केले.

दरम्यान, दुपारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, उत्तर गोवा उमेदवार ॲड. रमाकांत खलप, दक्षिण गोवा उमेदवार विरियातो फर्नांडिस, आमदार ग्लेन टिकलो यांनी उपस्थिती लावून आपला पाठिंबा दर्शविला.

भाजपकडून दडपशाहीचे सत्र ः खलप

भाजप सरकारने निवडणुकीच्या तोंडावर दडपशाहीचे सत्र सुरू केले आहे. बेकायदेशीर राजकीय नेत्यांवर सूड उगवण्याचे काम हे सरकार करीत आहे. अनेक प्रकारच्या खोट्या तक्रारी करून त्यांना अटक करण्याचे सत्र सुरू झाले आहे.

लोकशाही असलेल्या देशात निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांना अशाप्रकारे अटक कोठेही झालेली नाही. अनेक देशांतून या घटनेचा निषेध केला जात आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या आयएएस अधिकाऱ्यांनी देशात क्रांती घडविली.

त्यांचा व आमचा पक्ष वेगळा असला तरी लोकशाहीचा तो विजय आहे. भाजप केंद्रात सत्तेवर आले तेव्हा लोकांनी बदल केला, तो लोकशाहीचा परिणाम होता. लोकशाहीत जर काम करून दिले नाही, तर ती लोकशाही घट्ट कशी राहील, असा प्रश्‍न असल्याचे ॲड. रमाकांत खलप यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT