Bilawal Bhutto India Visit Dainik Gomantak
गोवा

Bilawal Bhutto India Visit: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो गोव्यात दाखल

गुरूवारी सकाळी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव गोव्यात दाखल झाले आहेत.

Pramod Yadav

Bilawal Bhutto India Visit: शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची दोन दिवसीय बैठक आज आणि उद्या (04 आणि 05 मे) गोव्यातील बाणावली येथे होत आहे.

यासाठी सकाळी रशियाचे परराष्ट्रमंत्री गोव्यात दाखल झाले त्यानंतर, नुकतेच चीनचे परराष्ट्रमंत्री किन गॅंग आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो गोव्यात दाखल झाले आहेत.

दरम्यान, गुरूवारी सकाळी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव गोव्यात दाखल झाले आहेत.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी गोव्यात येण्यापूर्वी भुत्तो यांनी व्हिडिओद्वारे त्यांच्या भारत दौऱ्याची माहिती दिली आहे.

"शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) बैठकीसाठी पाकिस्तान शिष्टमंडळासह मी आज गोवा, भारत येथे जात आहे. SCO बैठकीला आमची उपस्थिती पाकिस्तान या बैठकीला किती महत्व देते हे आधोरेखित करते.

संघटनेच्या सदस्य देशांसोबत आम्ही सकारात्मक चर्चेची अपेक्षा करतो." असे बिलावल भुत्तोंनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो तब्बल 12 वर्षांच्या कालावधीनंतर भारताला भेट देणारे पहिले परराष्ट्रमंत्री ठरणार आहेत. यापूर्वी 2011 मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिनी रब्बानी खार भारत भेटीवर आल्या होत्या.

दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर देखील SCO बैठकीसाठी गोव्यात असून आज सकाळी त्यांची शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) चे सरचिटणीस झांग मिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली. भारतासाठी SCO अध्यक्षपदासाठी दिलेल्या पाठिंब्याचे यावेळी जयशंकर यांनाी कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT