Arrest Dainik Gomantak
गोवा

Pune Crime: रंगकाम करताना घरमालकाला लावला चुना; पुण्यात 4 लाखांची चोरी करणाऱ्या प्रमोदला गोव्यात अटक

Pune - Goa Crime News: पुण्यातून गोव्यात पोलिसांना अलर्ट केल्यानंतर तो म्हापसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पुणे येथे घराचे रंगकाम करताना घरातील बेडरूममधून ४ लाख रुपयांची दोन सोन्याची कडी चोरून फरार झालेल्या संशयिताला म्हापसा येथे अटक करण्यात आली आहे.

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताला अटक करून चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै २०२५ रोजी पुणे शहर पोलिस ठाण्यात प्रमोद शिंदे (कोथरूड, पुणे) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

शिंदेने तक्रारदाराच्या घराचे रंगकाम करताना बेडरूममधून दोन सोन्याची कडी चोरून नेल्याची तक्रार होती. या गुन्ह्यानंतर तो फरार झाला होता. याबाबत पुण्यातून गोव्यात पोलिसांना अलर्ट केल्यानंतर तो म्हापसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी म्हापसा पोलिसांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी जलद कारवाई करत संशयित प्रमोद शिंदेला अटक केली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

Supreme Court: स्वतःच्या इच्छेनं देहव्यापार करणं गुन्हा नाही! वेश्याव्यवसायावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काय नेमकं प्रकरण?

Goa land Zoning: 17 गावांतील सुमारे 2.01 कोटी चौरस मीटर जमीन 'NDZ'मध्‍ये; सूचना, हरकतींसाठी 30 दिवसांची मुदत; टीसीपीचा निर्णय

IPL 2026: कॅप्टन रजत पाटीदारचा मास्टरस्ट्रोक; आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकले आयपीएलचे जेतेपद!

Goa Comunidade land: जमीन घोटाळा प्रकरणी सावंत गावकर आक्रमक; सर्वण कोमुनिदादची जमीन, गावकऱ्यांनी अखेर उभारला फलक

SCROLL FOR NEXT