Padocem Dainik Gomantak
गोवा

Padocem Water Plant: ‘पडोसे’ जलशुद्धीकरण प्रकल्पात बिघाड; साखळी, डिचोलीवासीय त्रस्त

Padocem: जलशुद्धीकरण प्रकल्पात वीज बिघाड निर्माण झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: नळाद्वारे पाणी पुरवठा बंद राहिल्याने आज पवित्र असा पहिला ''श्रावणी सोमवार'' कोरडा गेला. त्यामुळे गृहिणींसह भक्तांची मोठी गैरसोय झाली. साखळीसह डिचोलीतील काही भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पात वीज बिघाड निर्माण झाल्याने काल (रविवारी) रात्रीपासून पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. अशी माहिती जलस्रोत खात्याच्या सूत्रांकडून मिळाली.

परिणामी साखळीसह कारापूर, सर्वण आणि डिचोलीतील काही भागात काल रात्रीपासून आज (सोमवारी) दिवसभर नळ कोरडे राहिले. त्यामुळे पाण्यासाठी जनतेचे हाल झाले. हॉटेल व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला.काल रात्रीपासून नळाद्वारे पाणी न आल्याने महिलांची गैरसोय झाली.

व्रत पाळणाऱ्या भक्तांची गैरसोय

नळ कोरडे राहिल्याने सोमवार व्रत पाळणाऱ्या भक्तांची मोठी गैरसोय झाली. नळाद्वारे पाणी पुरवठा बंद राहिल्याने महिलांसह पुरुषांना पाण्यासाठी जवळपासच्या विहिरीवर धाव घ्यावी लागली. बहूतेक महिला तर नळांना पाणी कधी येईल. त्याची प्रतीक्षा लागून राहिली होती. जलशुद्धीकरण प्रकल्पातील बिघाड दूर करुन, सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नळांना पाणी आले, आणि मग जनतेचा जीव भांड्यात पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT