P S Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

नोकरभरतीत राजकीय हस्तक्षेप नको: पी.एस.श्रीधरन पिल्लई

गोवा लोकसेवा आयोगाच्या तिसऱ्या मजल्याचे उद्घाटन

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील मागील सरकारने केलेली नोकरभरती वादात सापडली होती.हा संदर्भ लक्षात घेऊन नोकर भरतीत राजकीय हस्तक्षेप नको, असे सांगून गुणवत्तेला वाव देऊन निष्पक्षपणे नोकर भरती करावी, असे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. ते लोकसेवा आयोगाच्या तिसऱ्या मजल्याच्या उद्‍घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष जोस मान्यूएल नोरोन्हा, सचिव यतेंद्र मरळलकर व सदस्य प्रा.डॉ.सुखाजी नाईक उपस्थित होते.राज्यपाल पुढे म्हणाले, आम्ही आर्थिकदृष्ट्या देशात प्रथम क्रमांकाचे राज्य आहोत. मात्र. गोव्याला आनंदी राज्य बनविण्यासाठी आम्ही सर्वांनी योग्य ते प्रयत्न करणे गरजेचे आहे.

यावेळी आयोगाचे अध्यक्ष जोस मान्यूएल नोरोन्हा यांनी आयोगाकडून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमादरम्यान गोवा लोकसेवा आयोगात 25 वर्षे कार्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा, तसेच तिसऱ्या मजल्याचे काम केलेल्या अभियंता, आर्कीटेक्ट व कंत्राटदारांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये कर्मचारी - सीमा मलकामेकर, पॉला रॉड्रिग्स, वृंदा वळवईकर, सरिता जयद्रे, शिल्पा बोरकर, मारिया मेंडोन्का, सुरेश पार्सेकर, जुवांव फर्नांडिस, मधुसूदन तारी, अल्कांटारा अरावजो, अंकुश गावडे, रामा निरवडेकर, देविदास प्रियोळकर. सेवानिवृत्त कर्मचारी- सिलिया ऑलिव्हेरा फर्नांडिस, मारियानो फर्नांडिस, प्रेमाकर शिरवईकर, संदीप नाईक, जोसेफ रॉड्रिग्ज. सार्वजनिक बांधकाम खात्याचे - उत्तम पार्सेकर, प्रधान मुख्य अभियंता, मारेनिन गोम्स चीफ आर्किटेक्ट, विवेक वाळके, कार्यकारी अभियंता, प्रशांत देसाई, आर्किटेक्ट, कंत्राटदार सुशांत खेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. डॉ. सुखाजी नाईक यांनी केले. यतेंद्र मरळकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT