Goa INEX 2023 Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील INEX 2023 प्रदर्शनात 150 हून अधिक इनोव्हेशन्स; जगभरातील नवसंशोधक होणार सहभागी

पोलंड, मलेशिया, इराण, इंग्लंड, रशिया, सायप्रस देशातील संशोधक येणार

Akshay Nirmale

Goa INEX 2023: गोव्यात होणाऱ्या इंडिया इंटरनॅशनल इनोव्हेशन अँड इन्व्हेन्शन एक्सपो (INEX) 2023 या प्रदर्शनात देशातील आणि परदेशातील एकूण 150 हून अधिक इनोव्हेशन्स (नवकल्पना) मांडले जाणार आहेत.

पुढील महिन्यात दक्षिण गोव्यात हे प्रदर्शन भरणार आहे. यात देशविदेशातील नवोन्मेषक सहभागी होणार आहेत.

सर्व क्षेत्रांतील नवकल्पना प्रदर्शित केल्या जातील. हा कार्यक्रम दक्षिण गोव्यातील फातोर्डा येथील डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे होणार आहे.

गोवा स्टेट इनोव्हेशन कौन्सिलचे अध्यक्ष जोस मॅन्युएल नोरोन्हा यांनी सांगितले की, 9 ते 11 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या या कार्यक्रमात भारतासह पोलंड, मलेशिया, इराण, इंग्लंड, रशिया आणि सायप्रससह इतर देशांतील नवसंशोधक सहभागी होणार आहेत.

गोवा स्टेट इनोव्हेशन कौन्सिल या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक आहे. गोवा सरकारचा विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभाग, इंडियन इनोव्हेटर्स असोसिएशन आणि एक पोलिश कंपनी IBS ग्लोबल या कार्यक्रमाचे सह-आयोजक आहेत.

नोरोन्हा म्हणाले की कझाकस्तान, मकाऊ, थायलंड, पोर्तुगाल आणि अमेरिका यांसारख्या इतर देशांचाही सहभाग अपेक्षित आहे.

इनोव्हेटर समुदायातील ज्ञानाच्या देवाणघेवाणीचा एक भाग म्हणून, प्रदर्शनादरम्यान टॉप 150 नवकल्पना प्रदर्शित आणि प्रकाशित केल्या जातील. याशिवाय गोव्यातील नवकल्पना देखील या प्रदर्शनात असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

Noida Fire: नोएडातील पाच मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा आक्रमक अवतार? भर मैदानात 'या' खेळाडूला मारली लाथ, कॅमेऱ्यामागे नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: HRA मध्ये अपेक्षेपेक्षा मोठी वाढ होण्याची शक्यता; फिटमेंट फॅक्टर ठरणार निर्णायक, पाहा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT