Goa Mining  Dainik Gomantak
गोवा

Pirna Thieviem: १ हजार ३२९ निवेदने सादर, उपस्थिती मात्र १०७ जणांची; पीर्ण-थिवीतील ‘खाण जनसुनावणीला' अल्‍प प्रतिसाद

Pirna Thieviem Mining: जनसुनावणीवेळी केवळ एकच लेखी आक्षेप नोंदवण्यात आला; खनिज व्‍यवसायाला बहुतांश लोकांचा पाठिंबा

गोमन्तक डिजिटल टीम

Pirna Thieviem Mine Public Hearing

पणजी: पीर्ण-थिवी येथील प्रस्तावित खाणीला पर्यावरण दाखला देण्यासाठी आज डिचोली येथे घेतलेल्या जनसुनावणीवेळी तब्बल १ हजार ३२९ निवेदने सादर करण्यात आली. मात्र या जनसुनावणीस अल्प प्रतिसाद मिळाला. केवळ १०७ जणच उपस्थित होते. जनसुनावणीवेळी केवळ एकच लेखी आक्षेप नोंदवण्यात आला. सकाळी १०.३० वाजता सुरू झालेली जनसुनावणी दुपारी २ वाजता आटोपली.

या खाणीतून वार्षिक ०.३३ मेट्रिक टन लोह खनिज काढण्यात येणार आहे. आठव्या खाणपट्ट्यात या खाणीसाठी लिलाव पुकारण्यात आल्यानंतर मे. काय इंटरनॅशनल प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनीने बोली जिंकली आहे. त्या कंपनीने पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल तयार करवून घेतल्यानंतर पर्यावरण दाखल्यासाठी अर्ज केला आहे. त्यासाठी ही जनसुनावणी घेण्यात आली.

उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-१ महादेव आरोंदेकर व गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. शमिला मोंतेरो यांच्या अध्यक्षतेखाली ही जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी कंपनीकडून प्रस्तावित खाण प्रकल्पाविषयी सादरीकरण करण्यात आले.

अर्जुन गावकर, संदेश केरकर, गौरेश नाईक, नंदन परब यांनी खाणकामाला पाठिंबा दर्शवताना खाण लवकर सुरू करण्याची मागणी केली. यशवंत नाईक यांनी इतर भागातील खाणकाम आधीच सुरू झाल्याकडे लक्ष वेधले. १२ वर्षे खाणी बंद असल्याने आता ही खाण लवकर सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. नारायण साळगावकर यांनी पूर्वीच्या खाणपट्टाधारकाने केलेल्या विकासाकडे लक्ष वेधले. आताच्या कंपनीनेही विकास करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

खनिज व्‍यवसायाला बहुतांश लोकांचा पाठिंबा

सुनावणीवेळी गावकरवाडा-डिचोली येथील सिद्धेश परब यांनी नमूद केले की, खाण सुरू झाली की रोजगार आणि ट्रक व्यवसायात स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे. आत्माराम तिळवे यांनीही खाणीला पाठिंबा दिला.

श्रीकांत धारगळकर यांनी लवकरात लवकर खाण सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. जगदीश आरोंदेकर यांनीही तसेच मत व्यक्त केले.

मयूर कळंगुटकर यांनी खाण कंपनीने शालेय विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी केली. गेली १२ वर्षे गाव विकासकामांपासून वंचित असल्याने तो विकास आता करावा असे ते म्हणाले.

खाण परिसरात लोकवस्ती आहे. त्यामुळे या खाणीला पर्यावरण दाखला मिळाल्‍यानंतर लोकांना आपल्या न्यायहक्कांसाठी झगडावे लागू शकते. खाणीपासून ५० मीटर अंतरावर विहीर आहे. तिचे संरक्षण केले पाहिजे. खाणीलगत शाळा, मंदिरे आहेत. त्यांनाही संरक्षण हवे. गावावर खाणीच्या होणाऱ्या परिणामांचा गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने अभ्यास करावा. खाणीचा गावाला फायदा होणार असेल तरच परवानगी देण्यात यावी.
शांबा सावंत, केळ-पीर्ण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT