Drishti lifeguard Dainik Gomantak
गोवा

Drishti Lifesavers Rescue: रशियन महिला अडकली समुद्रात, फ्रेंच महिलेवर भटक्या जनावराचा हल्ला; दृष्टी जीवरक्षकांकडून 10 जणांना जीवदान

Drishti Lifesavers: गोव्यात पर्यटक अडचणीत असले की, जीवरक्षक त्यांच्यासाठी देवदूतासारखे धावून येतात. याचीच प्रचिती गेल्या आठवड्याच्या शेवटी आली.

Manish Jadhav

गोव्यात पर्यटक अडचणीत असले की, जीवरक्षक त्यांच्यासाठी देवदूतासारखे धावून येतात. याचीच प्रचिती गेल्या आठवड्याच्या शेवटी आली. जीवरक्षकांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी अरबी समुद्रात 10 हून अधिक लोकांना बुडण्यापासून वाचवले.

जीवरक्षकांनी जखमी फ्रेंच महिला आणि दिल्लीतील एका पर्यटकाला वैद्यकीय मदतही पुरवली. राज्य-नियुक्त दृष्टी लाइफ सेव्हिंग एजन्सीने ही माहिती दिली.

एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, चार पर्यटकांच्या मौल्यवान वस्तू चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जीवरक्षकांनी पकडले. या चार पर्यटकांपैकी दोन रशियन पर्यटक होते. वीकेंडला समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

तरुणांची सुटका!

दरम्यान, कळंगुट समुद्रकिनारी पोहताना लाटांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 22 वर्षीय तरुणाची आणि 18 आणि 21 वर्षीय दोन स्थानिक तरुणांची जीवरक्षक दलाने सुटका केली, असे जीवन रक्षक एजन्सीच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितले. तर कळंगुट समुद्रकिनाऱ्याजवळ पाण्यात बुडणाऱ्या कर्नाटकातील (Karnataka) 35 वर्षीय व्यक्तीसह अन्य तीन जणांनाही वाचवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर रिप करंटमध्ये अडकलेल्या 50 वर्षीय रशियन नागरिकाला सुरक्षितरित्या किनाऱ्यावर आणण्यात जीवरक्षक दलाला यश आले.

फ्रेंच महिलेला वाचवले

रिप करंटमध्ये अडकलेल्या 51 वर्षीय रशियन महिलेला उत्तर गोव्यातील मोरजी समुद्रकिनारी तर महाराष्ट्रातील 27 वर्षीय पर्यटक (Tourists) आणि हैदराबादमधील 35 वर्षीय व्यक्तीची सुटका करण्यात जीवरक्षक दलाला यश आले. तर दुसरीकडे, दक्षिण गोव्यातील पाळोले समुद्रकिनाऱ्यावर भटक्या जनावराने हल्ला केलेल्या 56 वर्षीय फ्रेंच महिलेलाही जीवरक्षकांनी मदत केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

चोरट्याच्या मुसक्या आवळल्या!

कळंगुट समुद्रकिनाऱ्याजवळ समुद्रात पोहणाऱ्या मणिपूरमधील दोन पर्यटकांच्या बॅगमधून मोबाईल फोन आणि रोकड चोरुन पळ काढणाऱ्या चोरट्याला जीवरक्षकाने प्रसंगसावधान राखत पकडले, असे एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले. जीवरक्षकाने त्याच्याकडील मुद्देमाल पर्यटकांच्या हवाली केला आणि चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रश्न सुटेपर्यंत मागे फिरणार नाही; पिळगावातील महिलांचा निर्धार

Vinayakan Viral Video: "याचं डोकं फिरलंय का"? जेलर फेम विनायकनचं भांडण होतंय व्हायरल; मल्याळी भाषेचा गोवेकरांना अर्थ लागेना

Rakul Preet Singh At IFFI: '..पार्ट्यांना हजेरी लावल्यामुळे चित्रपटांत भूमिका मिळत नाही'; रकुलप्रीतने Nepotism बद्दल मांडले स्पष्ट मत

Anupam Kher At IFFI: 'भिगा हुआ आदमी बारिशसे नहीं डरता'; अनुपम खेर अपयशाबद्दल म्हणाले की...

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

SCROLL FOR NEXT