Bicholim
Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : ‘अवरलेडी’च्या विद्यार्थ्यांकडून डिचोलीत कचरामुक्तीचा संकल्प

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : डिचोली, येथील अवरलेडी ऑफ ग्रेस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (ता.१६) डिचोली पालिकेच्या लाखेरे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली.

विद्यार्थ्यांनी कचऱ्यावरील प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतल्यानंतर कचरामुक्तीचा संकल्प केला. अभ्यासाचाच एक भाग म्हणून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचरा व्यवस्थापन कसे करतात.

त्याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर प्लास्टिकचा वापर टाळण्याचा निर्धारही केला. बायो-गॅससंबंधी मिळवली माहिती कचरा प्रकल्पस्थळी येताच नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

विद्यार्थ्यांनी प्रकल्पात आत जाऊन स्वच्छता कामगार प्लास्टिकसह ओला आणि सुका कचरा वेगळा कसा करतात.

प्लास्टिकसह अन्य कचऱ्यावर प्रक्रिया कशी करतात. त्याची बारकाईने पाहणी करुन माहिती जाणून घेतली. ओला कचरा वेगळा करताना सफाई कामगारांना किती कष्ट घ्यावे लागतात. कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते.

त्याचे निरीक्षणही विद्यार्थ्यांनी केले. कचरा प्रकल्पस्थळी उभारण्यात आलेल्या बायो-मिथानेशन प्रकल्पाचीही विद्यार्थ्यांनी पाहणी केली. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर या प्रकल्पात बायो गॅस तयार कशी होते. बायो गॅसवर वीजनिर्मिती कशी होते. त्याविषयी सविस्तर माहितीही विद्यार्थ्यांनी मिळवली.

‘प्लास्टिक’ टाळण्याचे आवाहन

दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर बनत आहे. लहानसहान चुकांमुळे ही समस्या उद्भवत असते. असे विजयकुमार नाटेकर यांनी सांगून प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळावा. आपला परिसर स्वच्छ ठेवावा. असे आवाहन केले.

यावेळी काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकाचे श्री. नाटेकर यांनी निरसन केले. विभवी कामत या विद्यार्थ्यांनीने कचरा प्रक्रिया प्रकल्पात मिळालेली माहिती आणि अनुभव कथन करून स्वच्छतेचा निर्धार केला. प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहनही तीने केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Red Alert: गोव्यात रेड अलर्ट; सोमवारी बारावीपर्यंतच्या विद्यार्थी, शिक्षकांना सुट्टी

Goa: शेकडो वर्षापूर्वीचे झाड कोसळून अपघात, चार तासांपासून कारमध्ये अडकली महिला; तिघांना बाहेर काढण्यात यश

Konkan Railway News: कोकण रेल्वे पुन्हा ठप्प, आता रायगडमध्ये दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

Waves 2024: इफ्फीसोबतच गोव्यात होणार आणखी एक जागतिक कार्यक्रम; दिल्लीत शिखर परिषदेची घोषणा

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा वाहतूक पुन्हा ठप्प; बोरघर येथे महामार्गावर आले पाणी!

SCROLL FOR NEXT