Goa Court: Dainik Gomantak
गोवा

Anjuna: हणजूण पंचायतीला न्यायालयाने फटकारले

Anjuna: अनुपालन अहवाल सादर करा; बेकायदेशीर बांधकामांना टाळे ठोकण्यात चालढकलपणा

दैनिक गोमन्तक

Anjuna Panchayat:

हणजूण पंचायत क्षेत्रातील 175 बेकायदा बांधकामे सील करण्याचा आदेश देऊनही त्यातील काहींवर कारवाई न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पंचायतीच्या कार्यपद्धतीवर आज कोरडे ओढले.

काही आस्थापनांनी त्यांच्याकडे सर्व परवाने आहेत, असा दावा करत अर्ज सादर केले. त्यांची तपासणी करून पुढील सुनावणी 4 मार्चपर्यंत तहकूब करताना अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश पंचायतीला दिले आहेत.

करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी का केली नाही व पंचायतीनेच आस्थापनांना ना हरकत दाखले दिले आहेत तर ते ओळखण्यात कोणती अडचण येते, असा प्रश्‍न केला.

सविस्तर कारवाईचा अहवाल द्या

येथील दोन बांधकाममालकांनी खंडपीठात अर्ज सादर करून त्यांच्याकडे टीसीपी व बांधकाम परवान्याव्यतिरिक्त सर्व परवाने आहेत. या दोन्ही परवान्यांसाठी अर्ज केला जाईल, अशी माहिती दिली.

खंडपीठाने 175 बेकायदा बांधकामांना सील ठोकण्याचे निर्देश पंचायतीला दिले होते. त्यातील काहींना सील ठोकले, तर काहींनी त्यांच्याकडे परवाने असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कोणती बांधकामे बेकायदा आहे आणि कोणती नाहीत हे ओळखणे कठीण जात आहे, अशी बाजू पंचायतीने मांडली. त्यावर असमाधान व्यक्त करत सील

कारवाईत भेदभाव नको!

बलाढ्य लोकांच्या बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्याची पंचायतीची कृती सहन केली जाणार नाही. ज्यांच्याकडे ताकद नाही, त्यांच्या बांधकामांना सील ठोकले जात आहे. कायदा हा सर्वांना समान आहे. त्यामुळे पंचायतीने ही कारवाई करताना भेदभाव न करण्याची तंबी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT