Monsoon Canva
गोवा

Goa Rain Update: आज ऑरेंज अलर्ट, धरणांत मुबलक पाणी; वाळपईत सर्वाधिक पाऊस

Goa Weather: राज्यात मागील २४ तासांत सर्वाधिक ९१.२ मिमी म्हणजेच ३.५९ इंच पावसाची नोंद वाळपई येथे करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात गेले दोन दिवस दमदारपणे बरसलेल्या पावसाने राज्यभर पूरस्थिती निर्माण केली होती. शुक्रवारी दुपारपर्यंत पाऊस ओसरला. मात्र, काही प्रमाणात रिपरिप सुरूच होती. राज्यात मागील २४ तासांत सर्वाधिक ९१.२ मिमी म्हणजेच ३.५९ इंच पावसाची नोंद वाळपई येथे करण्यात आली.

राज्यभरात सरासरी एकूण ६१ मिमी म्हणजेच २.४० इंच पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत राज्यात एकूण ३,१५२ मिमी म्हणजेच १२४ इंच पावसाची नोंद केली असून सरासरी पावसाच्या तुलनेत तब्बल ५६ टक्के अधिक पाऊस पडला आहे. आतापर्यंत राज्यात सर्वाधिक पाऊस वाळपई येथे १५५.१० इंच इतका पडला आहे.

आज ऑरेंज अलर्ट

कोकणात समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने तसेच पश्‍चिम बंगाल येथे चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने शनिवारी देखील राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने गोवा वेधशाळेने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

राज्यातील धरणे फुल्ल

राज्यातील सर्वच धरणांत मुबलक प्रमाणात पाणी साठले आहे. साळावली, अंजुणे तसेच इतरही धरणांतून पाणी सोडले जात आहे. साळावली, चापोली, आमठाणे, पंचवाडी, गांजे येथील धरणे फुल्ल झाली आहेत, तर अंजुणे धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान

वाळपई : ९१.२ मिमी,

केपे : ८५ मिमी,

काणकोण : ८२.२ मिमी,

पेडणे : ६८.४ मिमी,

मडगाव : ६२.४ मिमी,

जुने गोवे : ५२.४ मिमी,

फोंडा : ५२.४ मिमी,

साखळी : ५१.२ मिमी,

म्हापसा : ३५.३ मिमी,

मुरगाव : २८.८ मिमी,

पणजी : २७.९ मिमी,

दाबोळी : २४.१ मिमी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT