Beach Dainik Gomantak
गोवा

गोवा समुद्रकिनारी बेकायदा 'इव्हेंट्स' करण्यास विरोध

केळशीत कायदाभंग: रस्‍ता अडवून मनोरंजनाचे कार्यक्रम; स्‍थानिक एकवटले

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात पर्यटन हंगाम सुरू होताच पर्यटकांची गर्दी ठिकठिकाणी दिसू लागली आहे. अशातच आता गोव्यात इव्हेंट्‌सही सुरू झाले असून त्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण होऊ लागल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केल्या जाऊ लागल्या आहेत. केळशी येथेही असाच प्रकार घडला.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. मात्र हेच कार्यक्रम आता सर्वसामान्य गोवेकरांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. बीचवर होणाऱ्या संगीत रजनींमुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दक्षिण गोव्यात केळशी समुद्रकिनाऱ्यावर दोन दिवसांपूर्वी असाच एक इव्हेंट साजरा करताना भरती रेषा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून स्थानिक पंचायतीला हाताशी धरून असे बेकायदेशीर इव्हेंट्स सर्रास होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

केळशीचे लोक आता आक्रमक झाले आहेत. मच्छीमारांनीही या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. केळशी किनारी आयोजित कार्यक्रमामुळे मासेमारीला धोका निर्माण झाल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. तर, स्थानिकांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उभारलेल्या सेटअपमुळे नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप केला आहे.

राष्‍ट्रीय हरित लवादाकडे प्रकरण नेणार

या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना अटक करण्याचा इशारा दिल्यानंतर काहीकाळ वातावरण तापले होते. संतप्त स्थानिकांनी याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. किनाऱ्याच्‍या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा स्थानिकांनी करत अशा प्रकारच्या कार्यक्रमांना तीव्र विरोध दर्शवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT