Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: आलेमाव यांचा अहवाल नामंजूर, सार्वजनिक उपक्रम समितीचा कार्यकाळ संपुष्टात; सिक्वेरांचे स्पष्टीकरण

Goa Assembly winter session 2025: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या २२ आणि २३ व्या अहवालांचे सभागृहात सादरीकरण केले.

Sameer Panditrao

Goa Assembly winter session Updates

पणजी: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या २२ आणि २३ व्या अहवालांचे सभागृहात सादरीकरण केले. मात्र, हा अहवाल स्वीकारण्यास ३० आमदारांनी विरोध केला, तर केवळ ६ विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्यास पाठिंबा दिला.

हा अहवाल २०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षांतील नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालांवर आधारित आहे. तथापि, अहवाल सादर करणाऱ्या समितीचा कार्यकाळ ३१ मार्च २०२४ रोजी संपुष्टात आल्याने हा अहवाल सभागृहात सादर करता येणार नाही, असे मंत्री अ‍ालेक्स सिक्वेरा यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांनी सूचित केले की, सभागृहाने या अहवालावर निर्णय घ्यावा.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत सांगितले की, सभागृहातील सर्व समित्यांचे पुनर्गठन झाले आहे आणि याबाबत बुलेटिनमध्ये संपूर्ण तपशील आहे. त्यांनी नमूद केले की, सभापतींनी १० फेब्रुवारी २०२४ रोजी दोन नवीन समित्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला.

त्यामुळे अहवाल स्वीकारण्याचा निर्णय सभागृहाने घ्यावा. आलेमाव यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अहवालांचे सादरीकरण केले. मात्र, सत्ताधारी आमदारांनी त्याला स्पष्ट विरोध केला. ३० आमदारांनी या अहवालाला विरोध दर्शविला, तर फक्त विरोधी पक्षातील ६ आमदारांनी त्याला पाठिंबा दिला.

‘गोमन्तक’चे ते वृत्त ठरले अचूक

सार्वजनिक उपक्रम समितीचा कार्यकाळ संपल्याचे वृत्त याआधी ‘गोमन्तक’ने दिले होते. त्यानंतर त्या समितीचा कार्यकाळ वैध असल्याचे सिद्ध कऱण्याचा प्रयत्नही झाला होता. आज विधानसभेत झालेल्या कामकाजामुळे ‘गोमन्तक’ने दिलेले ते वृत्त योग्यच होते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT