Rosary College Navelim Dainik Gomantak
गोवा

Navelim News: रोझरी महाविद्यालय इमारतीच्या विस्ताराला नावेलीत विरोध

Rosary College of Commerce and Arts: पार्किंग जागेत इमारतीचा प्रकल्प उभारू नये अशी मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

नावेली येथील रोझरी महाविद्यालय इमारतीच्या विस्ताराचा प्रस्ताव आहे. हा विस्तार पार्किंग जागेत करण्यात येणार आहे. या जागेत तळमजल्यासह दोन मजले बांधण्याचे नियोजन आहे. प्रत्येक मजल्यावर दहा मिळून २० वर्ग खोल्या उपलब्ध करण्याचा त्यांचा विचार आहे.

त्यासाठी ४० कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा तयार केला असल्याची माहिती एरल पिंटो यांनी रविवारी ग्रामसभेत दिली. मात्र, या विस्ताराला विरोध वाढल्याचे दिसून आले.

पिंटो म्हणाले की, नावेलीत आधीच पार्किंगची समस्या आहे. येथे एक मैदान आहे. हे मैदान नेमके कुणाचे, रोझरी हायस्कूलचे, उच्च माध्यमिकचे की महाविद्यालयाचे हेच मुळी कुणाला माहीत नाही. रोझरी महाविद्यालयावर ‘फाब्रिक द इग्रज रोझरी समिती’चे व्यवस्थापन आहे. या समितीने पार्किंग जागेत इमारतीचा प्रकल्प उभारू नये, असे आम्हाला वाटते, असेही पिंटो यांनी सांगितले.

...मग हा विस्तार कोणासाठी?

फाब्रिक समितीकडून असा प्रस्ताव पंचायतीकडे आला नसल्याचे स्पष्टीकरण सरपंच लुसिया कार्वालो यांनी दिले. जॉर्ज बार्रेटो यांनी सांगितले की, नावेलीतील महाविद्यालय हे नावेलीवासीयांसाठी असावे. पण नावेलीतीलच विद्यार्थी कुंकळ्ळीतील किंवा इतरत्र असलेल्या महाविद्यालयांमध्ये जातात. मग हा विस्तार कुणासाठी, असा प्रश्र्न त्यांनी केला. आम्ही कुठल्याही स्थितीत या महाविद्यालयीन इमारतीचा विस्तार करू देणार नाही, असेही बार्रेटो यांनी ठामपणे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

Goa Live Updates: थिवी रेल्वे स्थानकात 3 लाखांचा गांजा जप्त

Codar IIT Project: 'गावात आयआयटी नकोच'! गावडेंचा कोडारवासीयांना पाठिंबा; विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याची दिली माहिती

Watch Video: 'मोदी माझे गुरु' आरोग्यमंत्री राणेंचा पंतप्रधानांसाठी खास व्हिडिओ, म्हणाले "मी सामान्य कार्यकर्ता"

SCROLL FOR NEXT