Morjim Villagers  Dainik Gomantak
गोवा

Morjim Beach: किनाऱ्यावर गार्डन उभारण्यास विरोध, नवीन पार्किंगलाही आक्षेप

Morjim Panchayat: जमीनदार आणि जमिनी घेणाऱ्यांचे वाद संपुष्टात येत नाहीत तोपर्यंत कोणतेच परवाने देऊ नये अशी जोरदार मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी, ता. ३० (प्रतिनिधी) : टेंबवाडा येथील किनारी भागात सरकारमार्फत गार्डन उभारण्यास ग्रामसभेत विरोध दर्शविण्यात आला. या ठिकाणी नवी पार्किंग व्यवस्था करण्यासही ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. तसेच चेंजिंग रूम इतरत्र हलवून नये व या ठिकाणी नवे रस्ताही उभारू नये, अशा सूचना करण्‍यात आल्‍या.

येथील डोंगर माळरानावरील सर्वे क्रमांक ११ मधील जागेत जोपर्यंत जमीनदार आणि जमिनी घेणाऱ्यांचे वाद संपुष्टात येत नाहीत, तोपर्यंत येथे कोणतेच परवाने देऊ नये, अशी जोरदार मागणी ग्रामसभेत करण्यात आली.

ही ग्रामसभा सरपंच मुकेश गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पंच मंदार पोके, फटू शेटगावकर, सुरेखा शेट गावकर, विलास मोर्जे, रजनी शिरोडकर, स्वप्नील शेटगावकर, सुप्रिया पोके उपस्थित होत्‍या.

सरपंच गडेकर यांनी स्वागत केले. सचिव सचिन यांनी मागच्या सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम केला.

यावेळी मयूर शेटगावकर यांनी तेंबवाडा येथील पार्किंग आणि गार्डन यासंदर्भातील प्रश्‍न उपस्थित करत पर्यावरणाची हानी करून पाहणाऱ्या अशा प्रकल्पांना थारा देणार नाही, असा इशारा देत यासंदर्भातील ठरावही मांडला. तसेच गावातील पाणीपुरवठ्यासंदर्भातही शेटगावकर यांनी प्रश्‍न उपस्थित केला.

कचरा व्यवस्थापन समितीची मासिक सभा का होत नाही, सभा झाल्यास किती महिने झालेत, निधी किती आहे, असे प्रश्‍न तुकाराम शेटगावकर यांनी यावेळी उपस्थित केले. तसेच रस्त्यावरील खड्डे, सील केलेले बेअरिंग, न्यूवाडा येथील पार्किंग आदी प्रश्‍न उपस्थित केले. सरपंच मुकेश गडेकर यांनी या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.

मेगा प्रकल्पांना परवाने नकोच

भाटीवाडा येथील ग्रामस्थांनी डोंगर माळरानावरील सर्वे नंबर ११ मधील जागेचा वाद संपुष्टात येत नाही, तोपर्यंत या जागेत मेगा प्रकल्पाला कोणतेच परवाने देऊ नयेत. या जागेत जाणाऱ्या वाटेवर जे फाटक लावले आहे, ते हटवावे. तसेच या ठिकाणी ११ केव्ही भूमिगत वीजवाहिनी घातलेली आहे. तीसुद्धा काढून टाकावी. नवीन बोअरवेल मारण्यास परवाने देऊ नयेत, अशी मागणी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT