Manohar International Airport at Mopa Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मनोहर विमानतळावर आता होणार वेळेची बचत; चेक-इन, बॅगेज ड्रॉपसाठी जलद सुविधा कार्यरत

मनोहर विमानतळ अद्याप अपडेट असून, अनेक सुविधा हळूहळू येथे सुरू होत आहेत.

Pramod Yadav

Manohar International Airport at Mopa: उत्तर गोव्यात डिसेंबर 2022 रोजी नव्याने सुरू झालेल्या मनोहर विमानतळाचे उद्धाटन करण्यात आले. 05 जानेवारी 2023 पासून या विमानतळावरून विमान उड्डाणे सुरू झाली. मागील चार महिन्यांपासून विमानतळ सुसाट सुरू आहे.

मनोहर विमानतळ अद्याप अपडेट असून, अनेक सुविधा हळूहळू येथे सुरू होत आहेत अशीच एक सुविधा विमानतळावर कार्यान्वित करण्यात आली असून, त्यामुळे प्रवाशांचा विमानतळावर वेळ वाचणार आहे.

मनोहर विमातळावर मोबाईल चेक-इन काउंटर आणि सेल्फ-बॅगेज-ड्रॉप सुविधा कार्यरत करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना चेक-इन काउंटर येथे तासंतास रांगेत ताटकळत थांबण्याची गरज भासणार नाही. शिवाय सेल्फ-बॅगेज-ड्रॉप सुविधामुळे स्वत: सोबत असलेल्या साहित्याची देखील अधिक काळजी करण्याची गरज नाही.

या दोन्ही सुविधेमुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार असून, चेक-इन आणि बॅगेजची झंझट मिटणार आहे. तसेच, यामुळे येणार ताण देखील कमी होणार आहे.

दरम्यान, गोव्यातील उड्डाण संचालनाच्या 116 दिवसांत मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाने 10 लाख प्रवाशांची नोंद केली असल्याचे GMR गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळतर्फे सांगण्यात आले आहे. (सहा मे रोजी दिलेली आकडेवारी) देशभरातील 25 वेगवेगळ्या शहरांना जोडणाऱ्या उड्डाणांसह, खाजगी विमानतळ देशांतर्गत उड्डाणांसाठी टॉप 20 यादीमध्ये गणले जाते.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, एप्रिलच्या अखेरीस तीन नवीन शहरे जोडून विमानतळाने भारतातील 25 गंतव्यस्थाने जोडून आपली पोहोच वाढवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT