Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte On Tourist Helpline : कळंगुटमध्ये खुलेआम वेश्या व्यवसाय; पर्यटन मंत्र्यांनी पोलिसांवर फोडले खापर

पर्यटन क्षेत्राशी प्रश्नाबाबत लोकांनी थेट 1364 या हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधावा

गोमन्तक डिजिटल टीम

Rohan Khaunte On Tourist Helpline: किनारी भागात विशेषतः कळंगुटमध्ये अनैतिक धंद्यांचा प्रसार व पर्यटकांची लुबाडणूक करणाऱ्या बेकायदा टाऊट्सवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी वर्षभरापासून मी आवाज उठवत आहे आणि आता स्थानिक आमदार मायकल लोबो यांनीही या प्रश्नावर बोट ठेवले आहे.

मुळात दलालांची हिंमत इतकी वाढली आहे की, ते आता माध्यमांच्या प्रतिनिधींकडे वेश्या व्यवसायविषयी वाटाघाटी करतात.

याचाच अर्थ कळंगुट पोलिस कारवाई करण्यास अकार्यक्षम ठरत आहेत, अशा शब्दांत पर्यटनमंत्र्यांनी पोलिस निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मंगळवारी, म्हापशात ते माध्यमांशी बोलत होते.

पर्यटन विभागाशी निगडित सर्व बेकायदा टाऊट्स बंद झाले पाहिजेत अशी माझी मागणी आहे. कारण हेच दलाल वेश्या व्यवसायापासून वॉटर स्पोर्टस् व इतर पर्यटन क्षेत्रात गैरप्रकारांना वाव देतात.

आता लोबोंना या गोष्टीची वर्षभरानंतर जाणीव होते ही चांगली गोष्ट आहे. अशावेळी एकत्र मिळून या दलालांचे उच्चाटन करण्यासाठी काम केले पाहिजे, असे मंत्री रोहन खंवटे म्हणाले.

या बेकायदा टाऊट्समुळे मोठमोठ्या देशांपासून अनेक राज्यांतील पर्यटन संपुष्टात आले आहे. त्यामुळे बेकायदा दलालांचे वेळीच उच्चाटन होणे गरजेचे आहे.

यापुढे फक्त विधाने करून विषय मार्गी लागणार नाही, तर यासाठी कृतीची आवश्यकता असल्याचे खंवटे म्हणाले.

1364 क्रमांकावर संपर्काचे आवाहन

पर्यटन क्षेत्राशी निगडित कुठल्याही प्रश्नाबाबत लोकांनी थेट 1364 या पर्यटन विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकाशी थेट संपर्क साधावा.

जेणेकरून कुणीही लुबाडणूक किंवा छळवणूक करण्याचा प्रयत्न होणार नाही. पर्यटन क्षेत्रातील गैरप्रकार थांबविण्यासाठी लोकांनी वरील क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री रोहन खंवटे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT