Illegal Sand Extraction Dainik Gomantak
गोवा

Sand Extraction: केवळ पारंपरिक रेती उपशालाच यापुढे परवाने

Sand Extraction: मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सांवत: आमदार क्रुझ सिल्वा यांच्या प्रश्नाला उत्तर

दैनिक गोमन्तक

Sand Extraction: पणजी यापुढे केवळ पारंपरिकपणे नद्यांतून रेती काढण्यासाठी परवाने दिले जातील. यांत्रिकी पद्धतीने प्रामुख्याने दक्षिण गोव्यात झालेल्या बेसुमार रेती उपशामुळे न्यायालयाची रेती उत्खनन बंदी राज्यावर आली.

आता दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरण दाखल्यांसाठी अर्ज केले आहेत. ते दाखले मिळाले की परवाने दिले जातील. महिनाभरात ही प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिली.

वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी हा प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, रेतीअभावी सर्वांना त्रास होत आहे. रेतीचा ट्रक 20 हजारांवरून 33 हजार रुपयांवर पोचला आहे. निकृष्ट रेतीही बांधकामात वापरावी लागत आहे. अटल आसरा योजनेच्या लाभार्थ्यांना रेतीच्या वाढलेल्या दराचा त्रास होत आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, अमर्याद रेती उपशामुळे नदीकाठ कोसळू लागले. न्यायालयात हा विषय पोचला आणि बंदी आली. मांडवी, शापोरा, झुआरी नद्यांचा अभ्यास राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने करून अहवाल सादर केला आहे. त्या मर्यादेतच रेती काढण्यासाठी परवाने दिले जातील.

‘शेजारील राज्यातील रेतीमुळे दर नियंत्रणात’

सध्या शेजारील राज्यातून अधिकृतपणे रेती आणण्यासाठी प्रती फेरी ६०० रुपये आकारून परवाना दिला जातो. यामुळे रेतीचे दर नियंत्रणात राहण्यास मदत होते. क्रशरवाल्यांनाही एमसॅण्ड पुरवण्याची सूचना केली आहे. ती गिलाव्यासाठी उपयोगी नसली, तरी बांधकामात तिचा वापर होतो. सध्याच्‍या घडीला राज्याला किती रेती लागते याची माहिती सरकारकडे नाही, तसा अभ्यास करणे जरुरीचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT