MLA Divya Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: देशभरात फक्त मोदी सरकारचीच जादू!

Goa Politics: आमदार डाॅ. दिव्या राणे : भिरोंड्यात  ‘गाव चलो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

दैनिक गोमन्तक

Goa Politics: देशभर मोदी सरकारचीच जादू असून त्यांनी गेल्या 10 वर्षात विविध योजना तळागळापर्यंत पोहचवल्या आहेत. देशाबरोबर आमच्या राज्याचा सुध्दा झपाट्याने विकास होत आहे. मोठमोठे प्रकल्प याच काळात आले.

सत्तरीचा विकासही या डबल इंजिन सरकारमुळे होत आहे.यापुढेही मोदी सरकारमुळेच मोठे परिवर्तन घडणार आहे, त्यामुळे आमची जबाबदारी आहे की, मोदी सरकारला पुन्हा सत्तेवर आणावे, असे प्रतिपादन पर्येच्या आमदार डॉ.दिव्या राणे यांनी केले.

भिरोंडा पंचायतीत  आयोजित ‘गाव चलो’ अभियानाच्या  शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भिरोंडा सरपंच उदयसिंग राणे, रुपाली गावकर, रजनी राणे, विदेश नाईक सह सर्व पंच सदस्य, बूथ अध्यक्ष, तसेच इतर कार्यकत्यांची उपस्थिती होती.

आमदार राणे म्हणाल्या, गाव चलो अभियानातून घराघरातील प्रत्येकाशी संवाद साधण्याचा हा अनोखा अनुभव आहे. पर्ये मतदारसंघाचा विकास झपाट्याने सुरू आहे. रस्ते, पूल, पाणी, वीज आदी समस्या सोडविण्यासाठी नवनवे प्रकल्प आणले आहेत. तसेच अनेक विकासकामे सुरू झालेली आहेत. आपण निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा उद्देश असून टप्याटप्याने ती पूर्ण केली जाणार आहेत. यामुळे सत्तरीतून लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला बहुमत द्या, असे आमदार डाॅ. राणे म्हणाल्या.

कार्यकर्त्यांशी संवाद

यावेळी मोदी सरकारने देशात केलेली विकासकामे तसेच परिवर्तनकारी कामांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे,असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. केवळ बूथचे कामकाज समजून घेणे, हा आमचा उद्देश नसून तळागाळातील लोकांशी  आपले नाते आणखी दृढ करणे हा गाव चलो उपक्रमाचा उद्देश आहे.  यावेळी  संवादात  ज्येष्ठ कार्यकर्ते, नवमतदार, ज्येष्ठ नागरिक आणि उत्साही तरुणांसह विविध व्यक्तींशी संवाद साधला साधण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

SCROLL FOR NEXT