AAP

 

Dainik Gomantak 

गोवा

लोकशाहीचा खून करणाऱ्यांना केवळ केजरीवाल तुरुंगात पाठवू शकतात: शहापूरकर

आस्कावाडा-मांद्रे येथे पक्षाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन केल्यानंतर ‘आप’चे नेते ॲड. प्रसाद शहापूरकर बोलत होते.

दैनिक गोमन्तक

मोरजी: गोव्याचे राजकारण शुद्ध आणि स्वच्छ करण्यासाठी आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी केवळ आम आदमी पक्षाचेच (AAP) सरकार राज्याला दिशा दाखवू शकते. लोकशाहीचा खून करणाऱ्यांना केवळ ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल तुरुंगात पाठवू शकतात, असे प्रतिपादन ‘आप’चे नेते ॲड. प्रसाद शहापूरकर (Prasad Shahapurkar) यांनी केले.

आस्कावाडा-मांद्रे येथे पक्षाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नेते उपेंद्र गावकर, उमेश कोलवाळकर, युवा अध्यक्ष पूजन मालवणकर यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते. ॲड. प्रसाद शहापूरकर म्‍हणाले, राज्‍यात अनेक समस्‍या प्रलंबित आहेत. नोकरी (Job), पर्यटन (Tourism) समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत.

मामलेदार, गटविकास अधिकारी, उपजिल्हाधिकारी, पेडणे सरकारी कार्यालयात कर्मचारी कार्यालयात उपस्‍थित नसतात. परिणामी लोकांची कामे वेळेत होत नाही. मंत्री (Minister), आमदार यांचे लक्ष नसल्याने मनमानी वाढली आहे. किनारी भागात सीआरझेड समस्या, टॅक्सी व्यावसायिकांच्या समस्या आणि किनारी पर्यटकांसाठी ज्या समस्या आहेत त्या समस्या सरकारला आजपर्यंत सोडवता आल्या नाहीत, अशी टीका त्‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Madkai Fire News: ..आणि बघता बघता होत्याचे नव्हते झाले! मडकईत आगीचे थैमान; दागदागिने, कपडेलत्त्यांसह 10 लाखांचे नुकसान

Hill Construction Goa: डोंगर, टेकड्यांचा नाश रोखणार! मंत्री राणेंचे प्रतिपादन; 30% हून अधिक बांधकामांना मुभा देणार नाही

Goa Tree Cutting: झाडं तोडताय? सावधान! गोवा सरकारचे कडक निर्देश जारी; पारदर्शकतेसाठी नियमांत केले बदल

Goa Nightclub Fire: 'बर्च क्‍लब' आग प्रकरणाची धग वाढली! आणखी तिघे स्‍कॅनरखाली; अबकारी, अग्निशमनच्‍या अधिकाऱ्यांना नोटिसा

Horoscope: प्रगतीचा नवा अध्याय! 'या' राशींना मिळणार भाग्याची मोठी साथ, वाचा सविस्तर भविष्य

SCROLL FOR NEXT