Ponda Municipality Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipality: 53 वर्षांमध्ये केवळ आठच निवडणुका

फोंडा पालिका - 15 वर्ष प्रशासकाच्या हाती सत्ता, नवव्या निवडणुकीसाठी मतदार सज्ज

गोमन्तक डिजिटल टीम

आठव्या पालिका मंडळाचा कार्यकाळ 21 मे रोजी संपत असल्याने फोंडावासी आता नवव्या निवडणुकीला सज्ज झाले आहेत. ऑक्टोबर 1970 मध्ये फोंडा पालिका मंडळाची पहिली निवडणूक झाली. माजी मंत्री जोईल्द आगियार हे पहिले नगराध्यक्ष. त्यावेळी पालिकेची हद्द कुर्टीपर्यंत होती.

प्रभागही दहाच होते. त्यावेळी ती 'सी ग्रेड' पालिका होती. राज्यात जरी मगोपचे सरकार असले तरी पालिका काँग्रेसच्या कह्यात होती. 76 सालीही याचीच पुनरावृत्ती झाली. त्यावेळी मगोपचे चार, तर काँग्रेसचे सहा नगरसेवक निवडून आले. त्यात विद्यमान आमदार रवी नाईक यांचाही समावेश होता.

काँग्रेसचे वर्चस्व असूनही उपनगराध्यक्ष बनले ते मगोपचे महादेव खानोलकर. या मंडळाची मुदत राज्य संपल्यानंतर 1980 साली निवडणूक न घेता प्रशासक नियुक्त केला. शेवटी ऑगस्ट 1996 मध्ये निवडणुका झाल्या. परंतु 2005 साली पुन्हा पालिकेवर प्रशासक नियुक्त केला. मध्ये मध्ये होणाऱ्या प्रशासक नेमणुकीमुळे पालिका कारभारात काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या.

गेल्या 53 वर्षांत पालिकेच्या केवळ आठच निवडणुका झाल्या. त्याचे कारण म्हणजे, तब्बल 15 वर्षे ही पालिका प्रशासकांच्या ताब्यात राहिली. 1985 साली जेव्हा पालिका 'बी ग्रेड' झाली, तेव्हा उपनगराध्यक्षांना केबिन मिळाले. तेव्हा खानोलकर उपनगराध्यक्ष होते.

1985 साली जेव्हा पालिका 'बी ग्रेड' झाली, तेव्हा उपनगराध्यक्षांना केबिन मिळाले. तेव्हा खानोलकर उपनगराध्यक्ष होते. त्यांच्या कारकिर्दीत या केबिनचा चांगल्याप्रकारे उपयोग होत होता. पण आता हे केबिन शोपीस बनले आहे.

पण मुख्य प्रश्न आहे तो फोंडा शहर इतके वाढूनही अजून पालिकेला 'ए ग्रेड' मिळू शकलेला नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे फोंड्याची मर्यादित कक्षा. आज फोंड्याचा एवढा विस्तार होऊनही पालिकेची कक्षा मात्र तेवढीच राहिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT