Goa Congress Dainik Gomantak
गोवा

भाजपला फक्त काँग्रेसच घरी पाठवू शकतो: चिदंबरम

पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहचविल्याबद्दल प्रसार माध्यमांचे आभार; चिदंबरम

दैनिक गोमन्तक

Goa Congress: काँग्रेसचे वरिष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम यांनी शनिवारी सांगितले की, गोव्यातील लोकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असून, भाजपला फक्त काँग्रेसच घरी पाठवू शकतो. मी याबद्दल खूप आशावादी आहे आणि बहुमत मिळताच आम्ही त्वरीत सरकार स्थापनेचा दावा करणार, असे ते म्हणाले.

पी चिदंबरम (P chidambaram) यांनी शनिवारी पणजी येथे पत्रकार परिषद घेतली आणि पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहचविल्याबद्दल प्रसार माध्यमांचे आभार मानले. 'आमचे कार्यक्रम कव्हर केल्याबद्दल आणि ते गोव्यातील जनतेपर्यंत पोहोचवल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.' यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) आणि वरिष्ठ उपाध्यक्ष एम. के. शाह उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की, 'राजकारणात पक्षांतराचा इतिहास पुन्हा होणार नाही; कारण आम्ही आमच्या पक्षाचे रक्षण उत्तम प्रकारे करत आहे. गोव्यातील जनता काँग्रेसला (Congress) पूर्ण बहुमत देईल; कारण आमच्या उमेदवारांमध्ये आश्वासने पूर्ण करण्याची आणि प्रभावी प्रशासन देण्याची राजकीय क्षमता आहे. आमचे आमदार एकत्र राहतील आणि जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करून दाखवतील', असे ते म्हणाले.

काँग्रेसनेच भाजपला आक्रमकपणे विरोध केला. आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला गोव्यात प्रचारासाठी मदत केली. त्यांनी मतदारसंघांना भेटी दिल्या आणि लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गोवा हे मोदींसाठी निवडणुकीचे ठिकाण बनले आहे. ते गोव्यात निवडणुकीच्या (Goa Election 2022) वेळीच येतात, असे म्हणत त्यांनी भाजपवर टोला लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

Goa Water Issue: तीन महिन्यांतून एकदा वॉटर मीटर तपासणी सक्तीची! गोवा मानवाधिकार आयोगाचे PWD आणि आरोग्य खात्याला कडक निर्देश

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

SCROLL FOR NEXT