Taxi  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात केवळ 50 टॅक्सी डिजिटल मीटरविना

वाहतूक खात्याची खंडपीठाला माहिती : ‘टीटीएजी’ची याचिका निकालात

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील बहुतेक टॅक्सींना डिजिटल मीटर बसविले आहेत. सध्या फक्त 50 टॅक्सी डिजिटल मीटर बसवण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या टॅक्सींना मीटर नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. वाहतूक खात्याकडे नोंद असलेल्या 11025 पैकी 9362 टॅक्सींना डिजिटल मीटर बसवले आहेत, अशी माहिती वाहतूक खात्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिल्याने ‘टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स असोसिएशन ऑफ गोवा’ने (टीटीएजी) सादर केलेली याचिका निकालात काढण्यात आली.

केंद्र सरकारने देशातील सर्व टॅक्सींना डिजिटल मीटरची सक्ती केल्यानंतरही गोव्यात त्याची अंमलबजावणी होत नव्हती. टॅक्सीचालकांनी भरमसाट भाडे आकारून पर्यटकांची सतावणूक केल्याने त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होत असल्याची याचिका ‘टीटीएजी’ने सादर केली होती. त्याची दखल घेत खंडपीठाने सरकारला टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्यासंदर्भात पावले उचलण्याचे निर्देश देताना त्याचा वेळोवेळी अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

त्यामुळे टॅक्सी परवान्याची मुदत संपल्यानंतर डिजिटल मीटर बसविल्याशिवाय नूतनीकरण न करण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला होता. तसेच जे टॅक्सीचालक डिजिटल मीटर नसतानाही रस्त्यावर येतील, त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम सुरू केल्यावर टॅक्सीचालकांनी मीटर बसवण्यास सुरवात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT