onlin ganda 
गोवा

ऑनलाईन शिक्षण पडले महागात!

Subhash Mahale

सुभाष महाले

काणकोण :

मुले हातात मोबाईल आल्यानंतर काय करतील याचा नेम नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव एका सरकारी नोकरीत असलेल्या पालकाला आला आहे. त्याच्या बॅंक खात्यात असलेले २० हजार रुपये गायब झाल्याचे बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेले त्यावेळी लक्षात आले. ई- बॅंकिंगद्वारे मोबाईल वरून त्यांचे वीस हजार रुपये हस्तांतरीत झाल्‍याचे उघड झाले.
आपल्‍या खात्‍यातून पैसे हस्‍तांतर झालेच कसे? असा जाब त्‍या सरकारी नोकरदाराने दाबात विचारले असता, बँक अधिकाऱ्यांनी त्यांना तुमच्या मोबाईलवरून हे पैसे हस्तांतरीत झाल्‍याचे सांगितले. आपण पैसे हस्‍तांतरीत केलेच नाही. मग पैसे गेले कसे? असा प्रश्‍‍न उपस्‍थित झाला. त्‍यावर मोबाईल कुणाकडे आहे याची विचारणा केल्यावर त्या पालकाने मोबाईल मुलांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी दिला असल्याचे बॅंक अधिकाऱ्याला सांगितले.

या पालकाने पैसे बँक खात्यातून परस्‍पर हस्‍तांतर झालेच कसे? याबाबत त्या राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या अधिकाऱ्यांना बरेच खडसावले. मात्र, हे पैसे जॅकपॉट खेळात गेल्याचे स्पष्ट केल्‍यानंतर तो पालक अचानक हिरमुसला झाला. या प्रकाराने मुलाच्या ऑनलाईन शिक्षणातून हा फटका बसल्याचे लक्षात आल्यानंतर त्‍या पालकाने गप्प राहून बॅंकेतून काढता पाय घ्यावा लागला व फजितीही झाली.
ऑनलाईन शिक्षणानिमित्त आपले पाल्‍य शाळा व्‍यवस्‍थापनाकडून दिलेला अभ्‍यास काय व किती वेळेत तो होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. नपेक्षा गेम वा अन्‍य काहीतरी धुंडाळण्‍यात वेळ वाया घालवतो की काय? याचीही शहानिशा करणे आवश्‍‍यक आहे. मात्र, नोकरी वा व्‍यवसायानिमित्त पालकांकडे मुलांकडे लक्ष देण्‍यास पुरेसा वेळ मिळत नसल्‍याने असे प्रकार होतात.

कुतूहलापोटी अनावधानाने चूक
ऑनलाईन शिक्षणादरम्‍यान जाहिरातबाजी केली जाते. मात्र, शैक्षणिक अभ्‍यासक्रमावेळी जॅकपॉटसारख्‍या जाहिराती देणे कितपत योग्‍य? असाही प्रश्‍‍न आता उपस्‍थित होत आहे. मुलांनी अनावधानाने क्‍लिक केल्‍यावर कुतूहलापोटी पुढे पुढे क्‍लिक केल्‍यावर आर्थिक भुर्दंड त्‍यांच्‍या पाल्‍याला बसला. सरकारने अशा जाहिरातबाजीवर निर्बंध घालणे आवश्‍‍यक आहे. नपेक्षा मुलांची चौकसबुद्धी व कुतूहल त्‍याला बळी ठरून आर्थिक फटका बसू शकतो. असा प्रकार अन्‍य पालकाच्‍याबाबतही होऊ शकतो. काहीवेळा अघटितही होऊ शकते. त्‍यामुळे सरकारने अशा संकेतस्‍थळांवर बंदी घालावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT