electricity board services Canva
गोवा

Goa Electricity Board: वीज खात्यात आता सबकुछ 'ऑनलाईन'! अर्जांचे शुल्क झाले 'इतके', जाणून घ्या सुधारित दर

Electricity department mandates online submissions: वीज खात्यातील कामासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची माहिती असणे किंवा आंतरजाल (इंटरनेट) वापराची माहिती असणे गरजेचे झाले आहे. आता यापुढे लेखी अर्ज न स्वीकारण्याचा निर्णय वीज खात्याने घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आता वीज खात्यातील कामासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची माहिती असणे किंवा आंतरजाल (इंटरनेट) वापराची माहिती असणे गरजेचे झाले आहे. आता यापुढे लेखी अर्ज न स्वीकारण्याचा निर्णय वीज खात्याने घेतला आहे.

तशी अधिसूचना मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी जारी केली आहे. त्यानुसार नवी वीजजोडणी, नावात बदल, ग्राहक वर्गात बदल, वीज दाबात बदल, नाव व पत्त्यात दुरुस्ती यासाठी आता केवळ ऑनलाईनच अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. गोवा ऑनलाईन किंवा खात्याच्या संकेतस्थळावर हे अर्ज उपलब्ध आहेत. खात्याने शुल्कातही सुधारणा केली आहे.

उच्च दाबाच्या नव्या जोडणीसाठी अर्ज ५० रुपये तर प्रक्रिया करण्यासाठी ५०० रुपये, नावात बदल करण्यासाठी अर्ज १०० रुपयांना तर प्रक्रियेसाठी २५० रुपये, वर्ग बदलासाठी अर्जासाठी ५० तर प्रक्रियेसाठी २५० रुपये, दाबात बदल करण्याच्या अर्जासाठी ५० रुपये तर प्रक्रियेसाठी २५० रुपये, नाव व पत्त्यातील दुरुस्तीसाठी अर्जासाठी १०० रुपये तर प्रक्रियेसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT