Goa Road Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: कारच्या धडकेत ओडिशातील एकाचा मृत्यू; ओल्ड गोव्यातील घटना

राज्याला लागलेले अपघातांचे ग्रहण काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.

Kavya Powar

Goa Accident News

राज्याला लागलेले अपघातांचे ग्रहण काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. काल (ता. 10) जुने गोवेमध्ये झालेल्या अपघातात एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाढत्या अपघाताच्या घटना आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे चिंतेचे कारण बनत चालले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, जुने गोव्यातील कदंब बगल मार्गावर एका कारने रस्त्याने चालत असलेल्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. गोपाळ चंद्रा प्रधान (45, ओडीशा) असे मयताचे नाव आहे. दरम्यान या घटनेतील कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची पुढील चौकशी सुरू आहे.

दुसरीकडे, पणजी आणि पर्वरी येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या दोन अपघातांत दोन महिलांचा अवजड वाहनांच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनांवर आळा घालण्यासाठी वाहतूक विभागातर्फे देण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन चलकांना करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT