Goa Accident Deaths Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: गोव्याला अपघातांचे ग्रहण! म्हापश्यातील अपघातात एकजण जागीच ठार

काही वेळापूर्वी घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Road Accident Death in Goa : मागील काही महिन्यांपासून गोव्याला अपघातांचे जणू ग्रहणच लागले आहे. रस्ते अपघातांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नावच घेत नाही. दिवसेंदिवस या घटना आणि या घटनांमध्ये होणारे मृत्यू, जखमी होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे.

काही वेळापूर्वी घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपुरी, म्हापसा- मार्ना रस्त्यावर हा अपघात घडला आहे. रिक्षा टेम्पो आणि एका दुचाकीमध्ये जोरदार टक्कर झाली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर यामध्ये दुचाकीवर मागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला सध्या उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. पुढे त्याला GMC मध्ये दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

दुसरीकडे, अटल सेतूवर काल (गुरुवार) रात्री एक माल वाहतूक करणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि तो ट्रक एक बाजूला कलंडला.

दरम्यान, काल अपघाताची एक विचित्र घटना समोर आली होती. शिरसई येथे स्वयंअपघातानंतर चारचाकीत अडकून पडलेल्या जखमी चालकास अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलिसांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर गाडीतून बाहेर काढले. या अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाला असून तो म्हापसा फायर स्टेशनचा कर्मचारी आहे. या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT