One of three siblings drown while swimming in Mandovi River Dainik Gomantak
गोवा

म्हादई नदीत पोहायला गेलेल्या तिघा भावंडांपैकी एकाचा बुडून मृत्यू

नाणूस येथील घटना; दोघे वाचले; एकाची प्रकृती चिंताजनक

दैनिक गोमन्तक

वाळपई: वाळपई नगरपालिका क्षेत्रातील नाणूस - बेतकेकरवाडा भागातील म्हादई नदीत आज पोहण्यासाठी गेलेल्या तिघा भावंडांपैकी एका 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला, तर पाण्यात बुडणाऱ्या इतर दोघा भावांना स्थानिकांनी वाचविले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

नाणूस भागातील इरफान शेख, असिफ शेख, रिहान शेख हे तिघेजण सायंकाळी नाणूस भागातील नदीत अंघोळीसाठी उतरले होते. तिघेजण नदीच्या मध्यभागी पोचले होते. त्याचवेळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते तिघेही वाहू लागले. त्यावेळी एक मुलगा जवळच असलेल्या झाडाच्या फांदीला घट्ट धरून थांबला व आरडा ओरडा केला. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, पण इरफान शेख हा मुलगा वाहून गेल्याने पाण्यात बुडून मरण पावला, तर असिफ शेख व रिहान शेख या दोघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले.

नदीतून बाहेर काढलेल्या दोघांना 108 वाहनाने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इरफान शेखचा मृत्यू झाल्याने वाळपई नाणूस भागात शोककळा पसरली आहे. इरफान हा शांत स्वभावाचा होता. हे तिघेजण बंधू आहेत. नदीत मुले बुडल्याचे समजताच स्थानिक लोकांनी धाव घेऊन दोघांना जीवनदान दिले आहे. रिहान शेख याला पुढील उपचारासाठी गोमेकॉत पाठविण्यात आले आहे, तर असिफ शेख याची प्रकृती चांगली असल्याने त्याला घरी पाठविले आहे. हे कुटुंब मुळचे कर्नाटकचे आहे. त्यांचे वडील घरे रंगविण्याचे काम करतात.

लाड कुटुंबियांनी वाचविले दोघांचे प्राण

नाणूस येथील घटनेवेळी नदीच्या ठिकाणी लाड कुटुंबातील एक महिला कपडे धूत होती. तिने ही घटना पाहिल्यावर तातडीने आपला मुलगा साहील लाड याला सांगितले. साहिल लाड व लाड कुटुंबीय तत्काळ नदी ठिकाणी आले व नदीत जाऊन दोघांना वाचविले. त्यामुळे लाड कुटुंबियांनी दोघांना जीवनदान देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT