Goa Crime | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : पुन्हा अपहरणाची अफवा; आणखी एकाला जमावाकडून बेदम चोप

व्हिडिओ व्हायरल; प्रत्यक्षात निघाला झारखंड येथील निरपराध कामगार

सुशांत कुंकळयेकर

Goa Crime : मुले पळविणाऱ्या टोळीतील सदस्य गोव्यात फिरत आहेत या अफवेचा लोकांवर एव्हढा परीणाम झाला आहे की कुणालाही मुले पळविणारा असे समजून मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. वास्को येथे अशाच गैरसमजातून एका मनोरुग्णाला मारहाण करण्याची घटना ताजी असतानाच काल बेतालभाटी येथे एका निष्पाप बिगर गोमंतकीय मजुराला स्थानिकांनी मारहाण केली.

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला असून त्यात या मजुराचे हातपाय बांधून घालून लोक त्याला मारहाण करताना दिसतात. या संबंधी कोलवा पोलीसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सदर मजूर झारखंड येथील असून त्याचे नाव शानू साहू असे आहे. काही दिवसा पूर्वीच तो एका ट्रॉलरवर काम करण्यासाठी गोव्यात आला होता. काल बुधवारी तो गावात फेरफटका मारायला बाहेर पडला असता तो वाट चुकला. भांबावलेल्या अवस्थेत तो एकाचा परसात घुसला. त्याचवेळी कुणीतरी मुले पळविणाऱ्या टोळीतील हा सदस्य असल्याची हुल उठविल्यावर लोकांनी त्याला यथेच्छ चोपले.

या कामगाराला हिंदी भाषाही धड येत नसल्याने लोकांचा गैरसज अधिकच वाढला. शेवटी कुणीतरी कोलवा पोलीसांना ही खबर दिल्यावर पोलीस तिथे आले आणि त्याला ताब्यात घेतले.
काही दिवसापूर्वी मोती डोंगरावरही अशाच गैरसमजातून स्थानिकानी एका युवकाला मारहाण केली होती. त्यानंतर वास्को येथे अशी मारहाणीची घटना घडली.

वास्को येथे तिघांना अटक

मुले पळविणारा असे समजून वास्को येथे एका मनोरुग्णाला मारहाण करणाऱ्या तिघांना आज वास्को पोलिसांनी अटक केली. दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अभिषेक धनीया यांनी ही माहिती दिली. याही घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओ वरूनच या तिघांची ओळख पटली.

मडगावात सुरक्षा रक्षकाला अटक

एक भिकारी परत परत हाकलूनही जात नाही यामुळे त्याचा त्रास वाचविण्यासाठी त्याला मुले चोरणारा म्हणून पोलीसांच्या स्वाधीन केलेल्या हॉस्पिसिओ इस्पितळाच्या सुरक्षा रक्षकाला फातोर्डा पोलिसांनी खोटी माहिती प्रसारित करत असेलल्या आरोपाखाली अटक केली. त्यानें मुद्दामहुन पोलिसांना खोटी माहिती दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT