Car Accident Dainik Gomantak
गोवा

Car Accident at Shiroda: अपघातांचे सत्र थांबेना; शिरोडा येथील कार धडकेत एक जागीच ठार

शिरोडा येथील कार धडकेत तिघे गंभीर जखमी

दैनिक गोमन्तक

गोव्यात अपघातांचे सत्र थांबण्यास तयार नाही आज पुन्हा एका चारचाकीचा अपघात झाला असून या अपघातात शिरोड्यातील महिला जागीच ठार झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे समोर आलेल्या माहितीनुसार गोव्यात प्रत्येत 34 तासात एक कुटुंब अपघाताने उद्ध्वस्त होत असल्याचा प्रत्यय आज आला आहे.

(One killed on the spot in a car accident at Shiroda)

मिळालेल्या माहितीनुसार फोंडा तालुक्यातील शिरोडा येथे एक चारचाकी वेगाने धडक दिली असल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात उमा उमेश गुरव वय 66 यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अपघातग्रस्त कारचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी शिरोडा येथील गुरव कुटुंबिय चारचाकी वाहनातून शिरोडा मुख्य मार्गावरुन प्रवास करत होती. यावेळी एका वजनगाळ परिसरातील एका मोठ्या वळणावर गाडी आली असताना एका झाडाला वेगाने धडकली. या धडकेत उमा उमेश गुरव या ठार झाल्या तसेच कुटुंबातील इतर तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तसेच घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून घटनेचा पंचनामा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT