goa accident Dainik Gomantak
गोवा

मडगाव - कारवार हमरस्त्यावर अपघात; एक गंभीर जखमी

दापट- माशे दरम्यान वाहनांच्या वेगावर नियंत्रण येणे आवश्यक

दैनिक गोमन्तक

मडगाव -कारवार हमरस्त्यावर दापट- माशे येथे मडगावहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या केए 66 एम 4390 या कारने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. के एल 79-3687 वरुन मोटारसायकलने कारवारहून मडगावच्या दिशेने जात होता. यावेळी हा अपघात घडला.

(One injured in accident between motorcycle and car on margao-Karwar road)

मोटारसायकलस्वार गोवा पाहण्यासाठी येत होता. कार चालक दुसऱ्या वाहनाला बगल देऊन पुढे जात असताना हा अपघात घडला. या अगघातात मोटारसायकल स्वार जयदीप याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. काणकोण पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून जखमीला काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले आहे.

या अपघातात मोटार सायकलची जबर नुकसान झाली आहे. हमरस्त्यावर जवळच शैक्षणिक संस्था असल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी रम्बलर्स घालण्यात आले आहेत. या पूर्वी या ठिकाणी गतीरोधक होते मात्र हमरस्त्यावर गतीरोधक घालण्यास निर्बंध असल्याने रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करत असताना ते काढून टाकण्यात आले. आता घातलेल्या रम्बलर्सवरून गाड्या जाताना त्या घसरत असल्यामुळे अपघात होत आहेत. असे या भागाचे माजी पंच सांतान कॉस्ता व सिद्धेश प्रभू देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT