arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोवा-हैदराबाद अमली पदार्थ कनेक्शन; एकाला अटक

हैदराबाद येथे गोवा पोलिसांनी केली कारवाई

दैनिक गोमन्तक

गेले काही दिवस गोवा पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी विरोधात कारवाईचा वेग वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात सक्रीय असलेल्या अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी गोवा पोलिस पथक हैदराबादमध्ये दाखल झाले आहे. या कारवाईत आज एकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(One arrested in Goa-Hyderabad drug connection)

गोव्यात अमली पदार्थांचा चांगलाच सुळसुळाट सुरु आहे. या रॅकेटचा तपास करण्यासाठी गोवा पोलिस पथक हैदराबाद येथे दाखल होत एका संशयिताला ताब्यात घेतले असुन महेश गौड असे या संशयिताचे नाव आहे. त्याला हैदराबादच्या सिद्धीपेट जिल्ह्यातून अटक करण्यात आले आहे. या बाबत आणखी काही संशयितांच्या अटकेची शक्यता असून पोलिस तपास करत आहेत. याबाबत अधिकची माहिती लवकरच देऊ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आठ महिन्यांत 3 कोटीचे अमली पदार्थ जप्त

गोवा पोलिसांनी अमली पदार्थाविरोधातील आपली कारवाई वेगाने सुरु केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आठ महिन्यांत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 114 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. तसेच दर आठवड्याला सरासरी तीन ठिकाणी छापेमारी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गेल्या 8 महिन्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये गांजा, चरस, एलएसडी, एमडीएमए, एक्स्टसी गोळ्या, पावडर, कोकेन, चरस तेल, हेरॉइन आणि गांजा यांचा समावेश आहे, हे सर्व एकूण 91 किलोपेक्षा जास्त वजनाचे आहेत. त्यामुळे राज्यात अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT