हणजूण पोलिस पथकाकडून झोरवाडा-हणजूण येथे गुरुवारी (ता.14) उत्तररात्री मारण्यात आलेल्या छाप्यात अंदाजे एक लाख दहा हजारांचे अमली पदार्थ जप्त केले. ही कारवाई पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी सांगितले.
यावेळी संशयित अली आझम सरकार (26, पंश्चिम बंगाल) याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या त्याची रवानगी स्थानिक पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.
दरम्यान, अमली पदार्थविरोधी कारवाया हणजूण पोलिसांकडून सतत सुरू राहणार असून याबाबतीत कुठलीही हयगय केली जाणार नसल्याचे निरीक्षक देसाई यांनी सांगितले. तसेच शिवोली व परिसरात वास्तव्य करून राहाणाऱ्या भाडेकरूंची तपासणी मोहीम पुन्हा हाती घेण्यात येणार असून
घरमालकांनी नियमांचे उल्लंघन न करता भाडेकरूंची कायदेशीर कागदपत्रे जवळच्या पोलिस स्थानकात जमा करण्याचे आवाहन देसाई यांनी यावेळी केले.
अशा बेकायदा राहिलेल्या भाडेकरूंमध्येच गुन्हेगार लपलेले असू शकतात. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल तसेच म्हापसा पोलिस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली हणजूणचे पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.