Goa Crime News | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : न्यायाधीशांना चाकू दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला अटक

यापूर्वी न्यायालयातील चोरीप्रकरणी संशयितास अटक झाली होती

Rajat Sawant

Goa Crime News : प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायाधीशांना चाकू दाखवून धमकावून खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितास यापूर्वीही चोरीप्रकरणी अटक करण्यात आली होती.

प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायाधीशांना चाकू दाखवून धमकावून 40 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी अँड. मुजाहुद्दीन शेख या संशयितास अटक करण्यात आली आहे. वाळपई पोलिसांकडून ही अटक करण्यात आली.

यापूर्वी न्यायालयातील चोरीप्रकरणी संशयितास अटक झाली होती. आल्तिनो-पणजी येथील प्रथमश्रेणी न्यायालयाच्या मुद्देमाल कक्षात चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. वकिलाच्या वेशात आलेल्या चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे उघड झाले होते.

या न्यायालयाचे कर्मचारी बुधवारी (दि.01) सकाळी ड्युटीवर आले असता तळमजल्यावर असलेल्या प्रथमश्रेणी न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावरील मुद्देमाल कक्षाचा दरवाचा व त्याच्या मागील बाजूस असलेले दार खुले असल्याचे आढळून आले. कपाटेही खुली असलेली व मुद्देमाल अस्तावस्त पडलेला दिसला.

त्यामुळे चोरी झाल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आल्यावर त्याची माहिती मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी पणजी पोलिसांना कल्‍पना दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करत अँड. मुजाहुद्दीन शेख (रा. वाळपई) याला पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT