Crime News MP Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime News : अल्पवयीन मुलीला पाठवले अश्लील फोटो; म्हापशातील 40 वर्षीय इसमाला अटक

कोलवाळ पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News : अल्पवयीन मुलीला स्वत:चे अश्लील फोटो पाठवणाऱ्या एका संशयिताला कोलवाळ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कोलवाळ पोलिस पुढील तपास करीत आहेत.

कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने 18 जूनला पोलिसांत संशयिताविरोधात तक्रार दाखल केली होती. तिच्या मुलीशी संशयिताने इंस्टाग्रामवर मैत्री केली. त्यानंतर त्याने स्वताचा अश्लील फोटो तिला पाठवले आणि तिच्याकडून तशी मागणी केली असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

तक्रारीच्या आधारे म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी यांनी तपास करण्यासाठी पथक रवाना केले व संशयिताला अटक केली. अभिषेक सावंत, (40) रा. पिर्णा, बार्देश असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित सध्या पोलिस कोठडीत आहे.

पुढील तपास उत्तर गोवा जिल्ह्याचे पोलील अधीक्षक निधीन वाल्सन, म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली एलपीएसआय सोनम वेरेणकर यांच्याकडे पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT