Curchorem Murder | Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : बाणसाय खूनप्रकरणी अखेर संशयित ज्योएलला अटक

बाणसाय कुडचडे रेती व्यवसायातून झालेल्या खुनाचा उलगडा झाला आहे.

सुशांत कुंकळयेकर

Goa Crime : बाणसाय कुडचडे रेती व्यवसायातून झालेल्या खुनाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी कुडचडे पोलिसांनी बेकायदेशीर रेती व्यवसायात असलेल्या ज्योएल जॉर्व्हिस मोराईस (29) या युवकाला अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणात आरोपी युवकाला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती.

कुडचडे येथे 1 सप्टेंबर रोजी रेती काढण्यासाठी गेलेल्या मजुरांवर गोळीबार करण्यात आला होता. यात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला होता, तर एक गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी गेल्या बारा दिवसांपासून पोलीस तपास सुरू होता. आज मंगळवारी अखेर याप्रकरणी कुडचडे पोलिसांनी मोराईश याला अटक केली.

कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योएल जॉर्व्हिस मोराईस याला कुडचडे खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भा. दं. स 302, 307 खाली कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

बाणसाय कुडचडे येथील नदीच्या पात्रात बेकायदेशीर रेती काढण्याचा व्यवसाय सुरू होता. 1 सप्टेंबर रोजी रात्री बोटीने रेती घेऊन येताना अज्ञात व्यक्तीने बंदुकीची गोळी झाडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला होता. गेल्या बारा दिवसापासून पोलीस संशयितांचा शोध घेत होते. पहिल्या अटकेनंतर आता कुडचडे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

SCROLL FOR NEXT