lady stuck in a multi storey building Lift Dainik Gomantak
गोवा

Mapusa Women Stuck in Lift: बहुमजली इमारतीच्या लिफ्टमध्ये चढली मोलकरीण, अन् लाईट गेली, पुढे घडले असे काही...

म्हापशातील घटना; अग्निशामक दालाच्या जवानांनी राबवली बचाव मोहिम

Rajat Sawant

Mapusa Women Stuck in Lift: म्हापशातील एका बहुमजली इमारतीच्या लिफ्टमध्ये एक 40 वर्षीय महिला अडकल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही महिला जवळपास एक तास लिप्टमध्ये अडकली होती. या घटनेची माहिती मिळताच म्हापशा अग्निशमक दालाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हापशातील एका बहुमजली इमारतीतील लिफ्ट बंद पडल्याने लिफ्टमध्ये एक 40 वर्षीय महिला अडकल्याची घटना आज घडली. इमारतीची विज गेल्याने ही लिफ्ट बंद पडली. या बहुमलजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावर लिफ्टमध्ये महिला तब्बल एक तास अडकली होती.

सदर महिला या इमारतीमध्ये मोलकरीण म्हणून काम करते. या घटनेची माहिती मिळताच म्हापशा अग्निशामक दालाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी बचाव मोहिम राबवत तब्बल एक तासानंतर महिलेला लिफ्टमधून बाहेर काढले.

दरम्यान, या बहुमजली इमारतीत वीज गेल्यास लिफ्ट चालू राहण्यासाठी इन्व्हर्टर किंवा जनरेटरची पर्यायी तरतूद नाही आहे अशी माहिती तेथील स्थानिकांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT