Mahashivaratri Dainik Gomantak
गोवा

Mahashivaratri: शिवरात्रीनिमित्त राज्यातील मंदिरे भाविकांनी फुलली, मुख्यमंत्री सावंत यांनी केली रुद्रेश्वर मंदिरात सेवा अर्पण

पूजा, अभिषेक, रुद्र पठण आदी कार्यक्रमांचे आयोजन

Ganeshprasad Gogate

आज राज्यात शिवरात्रीचा उत्साह दिसून आला. शिवशंकरांच्या उपासनेसाठी शिवभक्तांनी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. पूजा, अभिषेक, रुद्र पठण आदी कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन बऱ्याच ठिकाणी करण्यात आले होते. शिवभक्तांसाठी आजचा दिवस महत्वाचा मनाला जातो.

राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील आज हरवळे येथील रुद्रेश्वर मंदिरात जाऊन आपली सेवा श्रींचरणी अर्पण केली. रुद्रेश्वर मंदिरात त्यांनी दूध आणि जलाचा अभिषेक केला. यावेळी रुद्र आणि शिव महिम्न याचे पठण करण्यात आले.

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ‘महाशिवरात्री’ साजरी केली जाते. शास्त्रात हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो. या महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी राज्यातील सर्व मंदिरे फुलांनी आणि विद्द्युतरोषणाईने सजली होती.

मागील दोन वर्षे कोरोना संक्रमणामुळे सर्वच सण उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. परंतु आता राज्यातील निर्बंध हटवण्यात आल्याने शिवभक्तांनी मंदिरात गर्दी केल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Metro Project: 'प्रकल्प नेमका कुणासाठी?' वॉटर मेट्रोच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह

Viral Video: 'एक चूक आणि खेळ खल्लास...' धावत्या लोकलच्या दारात तरुणीचा धोकादायक डान्स; व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

SCROLL FOR NEXT