Fishing Boat
Fishing Boat Dainik Gomantak
गोवा

पहिल्या दिवशी कुटबणहून मासेमारीसाठी 15 बोटीच रवाना

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : मासेमारी बंदी उठल्यावर आज खरे तर किमान 100 तरी ट्रॉलर मासेमारीसाठी समुद्रात जाण्याची आवश्यकता होती मात्र कुटबण येथे साळ नदीच्या मुखावर वाळूच्या पट्ट्याची भिंत उभी झाल्याने केवळ 10 ते 15 बोटीच मासेमारीसाठी दर्यात जाऊ शकल्या.

मच्छिमार फेडरेशनचे अध्यक्ष विनय तारी यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त 5 ते 6 च मोठे ट्रॉलर पाण्यात गेले असून काही प्रमाणात लहान ट्रॉलर पाण्यात गेले आहेत. आज सोमवारी सकाळी बोटी पाण्यात सोडण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या वाळूच्या पट्ट्याला लागत असल्यामुळे माघारी आणाव्या लागल्या असे त्यांनी सांगितले. एक बोट वाळूच्या पट्ट्याला लागून पाण्यातच अडकून पडली.

वास्तविक किमान 20 टक्के बोटी तरी पहिल्या दिवशी मासेमारीसाठी जाणे आवश्यक होत्या. मात्र दर्याला जोपर्यंत पूर्ण भरती येत नाही तोपर्यंत या पट्ट्यामुळे पाण्यात बोटी सोडणे धोकादायक बनले आहे. साळ नदीच्या मुखावर असलेले हे पट्टे गाळ उपसून मोकळे करा यासाठी आम्ही कित्येक वर्षे सरकारकडे मागणी करत आहोत पण त्यावर अजून गंभीरपणे विचार झालेला नाही असे तारी म्हणाले.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या ट्रॉलरवर एलईडी लाईट्स आणि जनरेटरचा वापर होतो याची किनारी पोलिसांकडून तपासणी केली गेली. या मासेमारी करणाऱ्या कामगारांचा आज केंद्रीय योजनेखाली विमाही उतरविण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: मंत्री सुभाष फळदेसाई यांना धमकी देणाऱ्याला रिवण येथून अटक

Panaji News : मध्‍यरात्री कानठळ्या, हृदयामध्ये धडकी; पणजी परिघातील प्रकार

Crime News : शेकडाे मजुरांची पडताळणी; खून प्रकरणानंतर मोपात सतर्कता

Margao Accident : कणकवली येथे कार उलटून मडगावातील सात प्रवासी जखमी

Sasashti News : सासष्टी तालुका काँग्रेेस पक्षाचा अभेद्य गड ढासळला

SCROLL FOR NEXT