Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

राज्यातील नेते-अधिकारी विश्‍वजीत यांच्या रडारवर

इशारा: दोषींवर 60 दिवसांत गुन्हे दाखल करणार

दैनिक गोमन्तक

पणजी: पदांचा गैरवापर करून स्वार्थासाठी कायदा धाब्यावर बसवून अनेकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. अशा नेत्यांसह सरकारी अधिकाऱ्यांवर येत्या 60 दिवसांत भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती नगरनियोजन मंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

मंत्री राणे यांची ‘गोमन्तक टीव्ही’साठी संपादक संचालक राजू नायक यांनी विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी नगरनियोजन, आरोग्य, वनविभाग, महिला बाल कल्याण आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली. सुरवातीला राणे यांनी सुरू असलेल्या नगरनियोजन खात्याच्या कारवाईबाबत माहिती दिली. राज्यात कांदोळी, कळंगुट, पर्रा, नागोवा यांसह अनेक ठिकाणी विविध नियमांचे उल्लंघन झाल्याच्या अनेक तक्रारी आल्यात. लोकांनी न्यायालयातही खटले दाखल केले आहेत. बार्देश तालुक्यात अनेक ठिकाणी शेतजमीन, खाजन शेती आणि कांदळवनावर (मँग्रोव्ह) मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून अत्यंत कमी एफएसआयमध्ये बहुमजली इमारती उभारल्यात. त्यांना साधे रस्तेही नाहीत. पदावर असलेले नेते आणि अधिकाऱ्यांनी सगळ्या परिसराचा सत्यानाश केला आहे. हे मी खपवून घेणार नाही. याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.

लोकायुक्तांकडे तक्रार करा!

नगरनियोजन खात्यामधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून कायद्याचे उल्लंघन करत बेकायदा बांधकामे केलीत. अनेक ठिकाणी बेसुमार वृक्षतोड, जमिनीवर भराव टाकणे, 30 अंशांपेक्षा जास्त उतार असलेली जमीन कापणे, डोंगर कापणे असे अनेक प्रकार घडलेत. याविरोधात लोकांनी पुढे येऊन लोकायुक्तांकडे तक्रारी द्याव्यात. टीसीपी त्यांच्या पाठीशी असेल, असे आवाहन राणे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री सावंतांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; गोवा भेटीचं दिलं निमंत्रण

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

‘नोरा फतेहीसारखं फिगर बनव, नाहीतर…’, नवऱ्याच्या छळाला कंटाळून महिलेची पोलिसात धाव; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Politics: ठरलं! दिगंबर कामत, रमेश तवडकर होणार मंत्री; गुरुवारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

Goa Minister Resigned: पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा राजीनामा; गुरुवारी तवडकर, कामत घेणार शपथ

SCROLL FOR NEXT