Omkar Elephant Update Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: 'ओंकार' शेतमळ्यांच्या प्रेमात, तांबाेसेत वाढला मुक्काम; शेतकरी मात्र हैराण

Omkar Elephant Update: पेडणे तालुक्यातील मोपा, कडशी, तोरसे आणि सध्या तांबोसे परिसरात ‘ओंकार’ हत्तीने गेल्या आठ दिवसांपासून हैदोस घातलाय.

Sameer Amunekar

मोरजी: पेडणे तालुक्यातील मोपा, कडशी, तोरसे आणि सध्या तांबोसे परिसरात ‘ओंकार’ हत्तीने गेल्या आठ दिवसांपासून हैदोस घातला असून, सलग तीन दिवस तो तांबोसे गावातील मळ्यात शिरून शेतकऱ्यांच्या भातशेती आणि कवाथे‑पोफळीची झाडे उध्वस्त करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष दीपक कलंगुटकर यांनी सरकारने उच्चस्तरीय दखल घेऊन या हत्तीचा बंदोबस्त तातडीने करावा, अशी मागणी केली आहे.

त्यांनी सांगितले की, वन खात्याचे काही कर्मचारी या हत्तीला हाकलण्यासाठी प्रयत्न करत असले तरी अधिकारी मात्र प्रत्यक्षात शेतात कुठेच दिसत नाहीत. हत्तीने झाडाझुडपात लपून पुन्हा पुन्हा शेतीवर हल्ले सुरूच ठेवले आहेत.

शेतकरी शैलेश सामंत यांचे कवाथे‑पोफळीची झाडे नष्ट होऊन सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांनीही तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. कलंगुटकर आणि धारगळचे माजी सरपंच अनिकेत सागावकर यांनी तांबोसेत शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कुठ्ठाळीत स्थलांतरीतांना हवाय कन्नड आमदार?? कन्नड महासंघाची मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याकडे मागणी

Goa Opinion: आमच्या टेकड्या सपाट होत आहेत, नद्या प्रदूषित होत आहेत, मासेमारीच्या जाळ्यातून सूटून 'गोवा' इंटरनेटच्या जालात अडकला आहे

Rohit Sharma Emotional: जल्लोष मैदानात, पण कॅमेऱ्यामनची नजर स्टँड्सवर! टीम इंडिया विश्वविजेता होताच 'मुंबईचा राजा' भावुक Video Viral

आम्हाला घाटी म्हणून हिणवू नका! गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र एकमेकांचे भाव; कन्नड मेटी यांनी तुकारामांना जोडले हात

Goa Today's News Live: राती खंयतरी, ग्लास घेवन बसून तू उलयता; मेटी यांचा मनोज परब यांच्यावर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT