Omkar Elephant Update Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: 'ओंकार'चे घराच्या ओसरीपर्यंत आगमन, बंदोबस्त करा; कडशी–मोपा परिसरातील नागरिकांची मागणी

Omkar Elephant Update : ओंकार हत्तीने गेल्या चार दिवसांपासून कडशी–मोपा परिसरातील शेती आणि बागायतींचे नुकसान चालवले असताना आता तो चक्क लोकवस्तीत घुसत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मोरजी: ओंकार हत्तीने गेल्या चार दिवसांपासून कडशी–मोपा परिसरातील शेती आणि बागायतींचे नुकसान चालवले असताना आता तो चक्क लोकवस्तीत घुसत असल्याने, तसेच पाठलाग करत असल्याने लोक दडपणाखाली आले आहेत. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

येथील पंच दयानंद गवंडी यांनी ओंकार हत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. सरकारने आतापर्यंत केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरल्या आहेत. एखादी दुर्घटना घडण्याची वाट सरकारने पाहू नये.

तसेच नुकसानग्रस्तांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.ओंकार हत्तीने मागील चार दिवसांपासून कडशी–मोपा भागात बस्तान मांडले असून शेती-बागायतींचे नुकसान करत आहे. तसेच तो लोकवस्तीत शिरून मोडतोडकरीत आहे.

पेडणे वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना चकवा दिलेल्या ओंकार हत्तीला शोधून काढण्यात अखेर यश आले. हा हत्ती कडशी, मोपा परिसरातील जंगलात आढळून आला. तेरेखोल नदी आणि आसपासच्या भागात त्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर मोपा, उगवे, तांबोसे भागातील काजू बागायत शोध घेण्यात आला. अखेर हा हत्ती कडशी येथील जंगल परिसरात सापडला. वन कर्मचारी त्याच्यावर नजर ठेवून आहेत, असे वन अधिकारी महाले यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT