Omkar Elephant Update Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: 'ओंकार'ला पुन्हा पुन्हा हाकलले जाते गोव्यात, महाराष्ट्रात सोडण्याचे सात वेळा प्रयत्न

Omkar Elephant Update: ‘ओंकार’ या हत्तीला महाराष्ट्राच्या हद्दीत सोडण्यासाठी गोव्याच्या वन खात्याने सात वेळा प्रयत्न केले, मात्र प्रत्येक वेळी त्याला पुन्हा गोव्याच्या सीमेकडे हाकलण्यात आल्याचा आरोप समोर येत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मोरजी: ‘ओंकार’ या हत्तीला महाराष्ट्राच्या हद्दीत सोडण्यासाठी गोव्याच्या वन खात्याने सात वेळा प्रयत्न केले, मात्र प्रत्येक वेळी त्याला पुन्हा गोव्याच्या सीमेकडे हाकलण्यात आल्याचा आरोप समोर येत आहे. १७ एप्रिल रोजी वनखात्याचे अधिकारी हरीश महाले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ओंकारला महाराष्ट्रातील डोंगरपाल भागात सोडले होते. मात्र, तेथील काही नागरिकांनी आगी लावून हत्तीला परत गोव्याच्या दिशेने हाकलल्याचे सांगितले जाते. परिणामी, हा हत्ती पुन्हा गोव्यात दाखल झाला.

वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून रात्रंदिवस या हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने तेही त्रस्त झाल्याचे चित्र आहे. हत्ती गावांमध्ये शिरून शेतीचे नुकसान करू नये, यासाठी वन खात्याचे पथक सातत्याने प्रयत्न करत आहे.

दरम्यान, या हत्तीच्या बंदोबस्तासाठी पश्चिम बंगाल येथील तज्ज्ञ पथकही महाराष्ट्र-गोवा सीमेजवळ तैनात आहे. मात्र, त्यांची उपस्थिती असूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, महाराष्ट्रात मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन हत्तीला परत गोव्याच्या दिशेने हाकलतात, असे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

निर्णयांवर प्रश्नचिन्ह

आठ दिवसांपूर्वी आमदार प्रवीण आर्लेकर, सरपंच सुबोध महाले, वरिष्ठ वन अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांची कडशी-मोपा परिसरात बैठक झाली होती. या बैठकीत ओंकार हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भविष्यात हा हत्ती एका गावातून दुसऱ्या गावात फिरत राहिल्यास मोठ्या अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

Colva Beach Pollution: कोलवा किनाऱ्याची झाली दैना! कचरा आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ; स्थानिकांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

Goa Assembly Election 2027: वेळ अजूनही गेलेली नाही! 2012चा इतिहास पुन्हा घडणार? गोव्यात बदलाची हवा वाहण्यासाठी विरोधकांची एकजूट हवीच

Goa Tiger Death: वाघाच्या मृत्यूनं खळबळ! खाणींच्या विळख्यात संपतोय 'जंगलाचा राजा'? पण वनखात्याची सोयीस्कर अनास्था

SCROLL FOR NEXT