Omkar Elephant Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: 63 दिवसांनी 'ओंकार' हत्ती गोव्याच्या सीमेवर; पत्रादेवी फकीर फाट्यावर रविवारी 'एन्ट्री'

Omkar Elephant Update: सिंधुदुर्गातील सातोसे, मडूरा आणि कास परिसरात गेल्या काही दिवसांपासून “हत्ती इलो रे…” अशी आली हाक स्थानिक ग्रामस्थांना दचकवत होती.

Sameer Amunekar

सिंधुदुर्गातील सातोसे, मडूरा आणि कास परिसरात गेल्या काही दिवसांपासून “हत्ती इलो रे…” अशी आली हाक स्थानिक ग्रामस्थांना दचकवत होती. या भागात भटक्या हत्ती ओंकारच्या हालचालींमुळे नागरिकांना विशेष सतर्कता बाळगावी लागत होती. अखेर हा हत्ती 30 तारखेला तो पत्रादेवी-फकीर पाट्यावर दिसल्याने गोवा-सिंधुदुर्ग सीमेजवळ पुन्हा एकदा वनविभागाची धडधड वाढली आहे.

सावंतवाडी तालुक्यातील मडुरे रेखवाडीतून 27 सप्टेंबर रोजी भ्रमंतीसाठी निघालेल्या ओंकारने तब्बल 63 दिवसांनंतर पुन्हा गोव्याच्या सीमेजवळील भागात प्रवेश केला आहे. सीमाभागात त्याच्या हालचाली वाढल्याने स्थानिक ग्रामस्थ, वनकर्मचारी आणि पोलिस प्रशासन सजग झाले आहे.

शनिवारी सायंकाळी ओंकार वाफोली आणि निमजगा भागातून पुढे सरकत सटमटवाडी, पत्रादेवी आणि नंतर महामार्ग 66 वरील नव्या टोल नाक्याच्या मागील जंगलपट्ट्यात पोहोचला आहे.

सध्या ओंकार डोंगरपाल–डिंगणे मार्गे कळणे दिशेला जातो की पुन्हा कडशी–फकीर फाटा मार्गाने गोव्याच्या आत प्रवेश करतो, हे अद्याप स्पष्ट नाही. ओंकारने यापूर्वीही याच मार्गाने प्रवास करत चांदेल आणि मोपा परिसरात हजेरी लावली होती. त्यामुळे हत्तीची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने होणार, याकडे प्रशासनासह स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

सीमाभागात हा हत्ती पुन्हा दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून विशेष पुढाकाराने खबरदारी सुरू आहे. वनविभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी रस्ते-लगत किंवा जंगलाजवळ अनावश्यक हालचाल टाळण्याची विनंती केली आहे. तसेच ओंकारला कुठलाही त्रास न होता त्याची सुरक्षित मार्गक्रमणा होण्यासाठी वनकर्मचारी सतत गस्त आणि निरीक्षण ठेवत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"ऑपरेशन सिंदूर सर्वात मोठा हल्ला, अल्लाहनचं आम्हाला वाचवलं," लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरची जाहीर कबुली; पाकड्यांचा पुन्हा बुरखा फाटला

Goa Winter Session 2026: "आधार कार्ड म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं; मतदार यादीतून गैर-नागरिकांची नावं हटवणार

Indian Army: भविष्यातील युद्धांसाठी भारतीय सेना सज्ज! 'फ्युचर रेडी' फोर्स म्हणून जगात ठरणार वरचढ, लष्करप्रमुखांनी शत्रूंना दिली तंबी VIDEO

Khelo India Beach Games 2026: गोव्याची कामगिरी सुधारली, खेलो इंडिया बीच गेम्समध्ये एका सुवर्णासह चार पदके

Goa Winter Session 2026: अंधार दूर होणार, प्रकाश येणार! वीज जोडणीसाठी लवकरच नवा अध्यादेश, हायकोर्टाच्या बंदीनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT