Omicron Variant JN.1 in Goa Dainik Gomantak
गोवा

Omicron Variant JN.1 in Goa: सावधान! गोव्यात आढळले कोरोनाच्या जेएन 1 संसर्गाचे 19 रुग्ण

राज्यात सध्याच्या घडीला 23 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

Pramod Yadav

Omicron Variant JN.1 in Goa: देशात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. नव्याने आलेल्या कोरोना JN.1 ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. केरळनंतर आता गोव्यात ओमिक्रॉन व्हेरिएंट BA.2 (JN.1) चे 19 रुग्ण आढळून आले आहेत.

उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातील जीनोमिक सिक्वेन्सिंगद्वारे ही चाचणी करण्यात आली.

आढळून आलेल्या रुग्णांनी सात दिवसांचा कालावधी पूर्ण केला असून त्यांच्यात चिंताजनक लक्षणे आढळून आलेली नाहीत. तसेच, त्यांचा राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत समावेश देखील नाही, अशी माहिती ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

आम्ही सर्व रुग्णांना संपर्क साधला असून, ते ठणठणीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

मंगळवारी केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 20 रुग्ण आढळून आले होते. यात 18 गोव्यातील तर केरळ आणि महाराष्ट्रातील एक-एक अशी रुग्णांची आकडेवारी समोर आली आहे.

गोव्यात आढळून आलेले कोरोना JN.1 ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण अलिकडेच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संक्रमित झाल्याचे समोर आले आहे.

सकारात्मक नमूने आलेल्या सर्व रुग्णांना घरीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यापुढे देखील चाचण्या सुरु राहतील असेही ते म्हणाले.

राज्यात सध्याच्या घडीला 23 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मंगळवारी नव्याने तीन रुग्णांची भर पडली असून, दोन कोरोनामुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT