Omicron Cases in Goa

 
Dainik Gomantak
गोवा

गोव्यात ओमिक्रॉनचे आणखी 8 बाधित सापडले

कोरोना रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ, एकाच दिवसात हजारावर रुग्ण

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात कोरोना संसर्गासोबतच ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्णही सापडू लागले आहेत. गोवा राज्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. गोव्यात बुधवारी आणखी 8 जणांचे अहवाल ओमिक्रॉन (Omicron Cases in Goa) पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काल बुधवारी पुण्यातील एनआयव्हीमधून हे अहवाल पाठवण्यात आले आहे. गेले कित्येक दिवस हे अहवाल प्रलंबित होते. ओमिक्रॉन (Omicron Variant) पॉझिटिव्ह आलेल्या तिघांची ट्रव्हल हिस्टरी असून इतर पाचजण गोव्यातील रहिवासी आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाचजणांची कोणतीही ट्रव्हल हिस्टरी नसल्याने समूह संसर्गाचा धोका आणखी बळावला आहे.

दरम्यान गोव्यात (Goa) 8 ओमिक्रॉन व्हेरिएंटसह तब्बल 1002 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गोव्यात कडक निर्बंध (Restrictions) लादण्याची मागणी आता वाढू लागली आहे. गोव्यात सापडलेला पहिला ओमिक्राँट व्हेरिएंटचा रुग्ण हा आठ वर्षाचा लहान मुलगा असल्याने शाळा बंद करण्याची मागणीही जोर धरत होती. आता शाळा बंद करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र शाळा (School) बंद करण्यातील दिरंगाई मुलांसाठी धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT