olive ridley 
गोवा

Galajibag Beach: ..यामुळे ऑलिव्ह रिडलेची 89 अंडी ‘आगोंद’ हून गालजीबाग किनाऱ्यावर स्थलांतरित

गालजीबाग किनाऱ्यालगतची जमीन सागरी कासवांच्या आरक्षणासाठी वनखात्याने संपादित केली आहे.

दैनिक गोमन्तक

Galajibag Beach: गोंद किनाऱ्यावर बुधवारी सागरी कासवाने घातलेली 89 अंडी गालजीबाग किनाऱ्यावर स्थलांतरित करण्यात आली आहेत. गालजीबाग किनाऱ्यावरील कासव संवर्धन केंद्रातील हे दुसरे सागरी कासवांच्या अंड्याचे घरटे आहे.

यापूर्वी 18 डिसेंबरला पहिल्या सागरी कासवाचे तळपण किनाऱ्यावर आगमन होऊन त्याने 93 अंडी घातली होती. काणकोणातील गालजीबाग व आगोंद किनारे सागरी कासवांसाठी आरक्षित आहेत. गालजीबाग किनाऱ्यालगतची जमीन सागरी कासवांच्या आरक्षणासाठी वनखात्याने संपादित केली आहे.

कमर्शियल झोनची निर्मिती कशासाठी ?

गतवर्षी आगोंद किनारी 30 कासवे आली होती, तर गालजीबागवर 11 कासवांनी अंडी घातली होती. वन खात्याने उत्तर व दक्षिण अशी दोन मरीन झोन केली आहेत. गर्दीचा किनारा असूनही आगोंद वर लक्षणीय ऑलिव्ह रिडले अंडी घालण्यासाठी येतात.

कमर्शियल झोनची अधिसूचना काढून कासवांनाच येथून हद्दपार करण्याची भूमिका सरकारने घेतलीय का, असा प्रश्न येथील पर्यावरण प्रेमींना पडला आहे.

झोनचे मुख्यालय गालजीबाग किनारा असल्याने आगोंद येथील सागरी कासवांनी घातलेली अंडी सुरक्षिततेच्या दृष्टीने गालजीबाग किनाऱ्यावर स्थलांतरित करण्यात आली आहेत. गतवर्षी१३ जानेवारीला प्रकाशित अधिसूचनेत मोरजीसह आगोंद व्यावसायिक झोन म्हणून जाहीर केले होते. त्यामुळे हे स्थलांतरण करण्यात आले आहे. 1999 पासून हे किनारे सागरी कासवांसाठी आरक्षित आहेत. - विवेक गावकर,दक्षिण मरीन झोनचे क्षेत्रिय वनाधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT