Old Goa Police
Old Goa Police  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: युवकाचे अपहरण करून खूनाची धमकी, जबरदस्ती ATM मधून पैसेही काढले

गोमन्तक डिजिटल टीम

एकोणीस वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याला खूनाची धमकी दिली तसेच, त्याच्या एटीएममधून जबरदस्तीने पैसे देखील काढले. जुने गोवे पोलिसांनी (Old Goa Police) याप्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. अवघ्या दोन तासांत जुने गोवे पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय गुप्ता (वय 19) या युवकाचे रायबंदर (Ribandar) येथून अपहरण करण्यात आले. संजय गुप्ता या युवकाला रायबंदर येथून तालेगाव (Taliegao) येथे घेऊन जात, त्याच्या एटीएममधून जबरदस्तीने पैसे देखील काढले. आरोपींनी संजय गुप्ता याला जीवे मारण्याची धमकीही दिली.

जुने गोवे पोलिसांनी याप्रकरणी बिजेंद्र शिवरतन प्रसाद, अमन रफीक नदाफ आणि रणजीत निर्मल चौहान यांना अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

एडविन नूनीस विरोधात हणजूण पोलिसांत गुन्हा दाखल

सोनाली फोगाट प्रकरणात (Sonali Phogat Case) संबधित आरोपी व कर्लिस नाईट क्लबचा मालक एडविन नूनीस (Edwin Nunes) याच्या विरोधात हणजूण पोलिसांत (Anjuna Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी टाळण्यासाठी नूनीसकडून बनावट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करण्यात आले. यावरूनच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

SCROLL FOR NEXT